दादर “चैत्यभूमी येथे भव्य राष्ट्रध्वज शासनाने उभारण्यात आलाच पाहिजे” त्या उद्देशाने संविधान दिनानिमित्त ‘राष्ट्रध्वज रॅली’
गुणवंत कांबळे
मुंबई प्रतिनिधी
मो. नं.९८६९८६०५३०
मुंबई- संविधान दिनाच्या निमित्त भारतीय लोकसत्ताक संघटनेच्या वतीने “चैत्यभूमी येथे अशोक स्तंभ शेजारी भव्य असा राष्ट्रध्वज शासनाच्या वतीने उभारण्यात आलाच पाहिजे” त्यानिमित्ताने ‘राष्ट्रध्वज रॅली’ २६ नोव्हेंबर २०२२ रोजी, सायंकाळी ४.३०. वा.आयोजित करण्यात आली होती. या रॅलीचा मार्ग प्रबोधनकार ठाकरे पूर्णा कृति पुतळा ते चैत्यभूमी दादर मुंबई येथे चालत बहुसंख्येने लोकांचा राष्ट्रध्वज रॅलीमध्ये सहभाग घेऊन उपस्थिती दर्शवली होती.
भारतीय लोकसत्ताक संघटनेची मागणी
‘चैत्यभूमी येथे अशोक स्तंभा शेजारी भव्य असा राष्ट्रध्वज शासनाच्या वतीने उभारण्यात आलाच पाहिजे’.
दादर चैत्यभूमी हे अखडं भारताचेच नाही तर संपूर्ण जगाचे ऊर्जास्थान, प्रेरणास्थान आहे. येथे दररोज देशातील वेगवेगळ्या राज्यातील नागरिक त्याचबरोबर विविध देशातील नागरिक आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे येत असतात.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर मानवाधिकार, मानवतेसाठी अविरत संघर्ष केला.न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या तत्वासाठी त्यांनी आयुष्य खर्ची घातले, याच तत्वावर आधारित भारतीय संविधान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला बहाल केले, याच तत्वाचे प्रतीक आपला राष्ट्रध्वज आहे.चैत्यभूमी येथे अशोक स्तंभाच्या शेजारी शासनामार्फत भव्य असा राष्ट्रध्वज उभा करण्यात यावा.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाच्या शिल्पकाराबरोबरच ते राष्ट्रध्वजाचे शिल्पकार देखील आहेत. “मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः भारतीय” ही राष्ट्रवादाची भूमिका मांडणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव आदर्श आहेत. त्यांची ही देशभक्तीची प्रेरणा भारतीय नागरिकांना सातत्याने मिळत रहावी. भारतीय संविधान ,भारतीय राष्ट्रध्वज यांचे शिल्पकार म्हणून खऱ्या अर्थाने अभिवादन व त्यांच्या कार्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतीस्मारकाच्या परिसरात चैत्यभूमी येथे अशोक स्तंभाच्या शेजारी शासनाद्वारे भव्य असा राष्ट्रध्वज उभा करण्यात यावा. चैत्यभूमी येथे भव्य असा फडकणारा राष्ट्रध्वज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची देशभक्तीची प्रेरणा कायमच राष्ट्राला देत राहील.
सदर देशभक्तीच्या व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेचा योग्य तो विचार करून चैत्यभूमी येथे भव्य राष्ट्रध्वज शासनाच्या वतीने उभाकरण्यात यावा या बाबत गेले पाच वर्षे भारतीय लोकसत्ताक संघटना सातत्याने शासन प्रशासनाशी पाठ पुरावा करीत आली आहे. परंतु शासन प्रशासन सदर मुद्या बाबत जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत आहे असे संघटनेच्या माध्यमातून सांगण्यात आले.
राष्ट्रध्वज रॅली चैत्यभूमी दादर मुंबई येथे भारतीय लोकसत्ताक संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून रॅलीचा समारोप करण्यात आली.