संविधानामुळेच भारतात लोकशाही गुण्यागोविंदाने नांदत आहे, संस्थाध्यक्ष के.एन बोरकर. रमाबाई आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन साजरा

बाबा मेशाम

सावली तालुका प्रतिनिधी

सावली: जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना भारत देशाची आहे,घटनेनुसार दिलेल्या स्वातंत्र्य समता,बंधुता,न्याय , समानता ,धर्मनिरपेक्षता लोकशाही तत्वाचा समावेश असल्याने भारतात संविधानामुळेच लोकशाही गुण्यागोविंदाने नांदत आहे असे मत संस्थाध्यक्ष के.एन बोरकर यांनी व्यक्त केले ,ते रमाबाई आंबेडकर विद्यालयात संविधान दिन कार्यक्रमात बोलत होते.

   रमाबाई आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय आणि माऊंट विज्ञान महाविद्यालय सावली ईथे संविधान दिवस साजरा करण्यात आला यावेळी मंचावर डा बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिति शिक्षण प्रसारक संस्था सावली चे संस्थाध्यक्ष के.एन बोरकर, संस्था सचिव प्रा.विशाखा सि.गेडाम, संचालक बि .के.गोवर्धन, सौ.चंद्रभागा गेडाम, व्हि के.बोरकर,प्राचार्य एन .एल शेंडे, अड. आर्दश गेडाम, अड.धनंजय आंबटकर आदी उपस्थित होते.

 कार्यक्रमाची सुरुवात भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतीमेला मालार्पण करून वंदन करण्यात आले.त्यानंतर राष्ट्रगीताचे सामुहिक गायन करुन घटनेच्या उद्दशिकेचे वाचन करण्यात आले.नंतर लगेचच सावली नगरातील मुख्यरस्त्यावरून बॅडपथकाच्या गजरात आणि संविधान लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या वतीने घोष्यवाक्याच्या निनादात फुले वार्डामधून भव्यदिव्य रॅली काढण्यात आली.या रॅली मधे बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना राजेंद्र प्रसाद आणि पंडीत जवाहरलाल नेहरू यांना सुपूर्द करतांनाचा देखावा दाखविण्यात आला.

           कार्यक्रमात अड. आंबटकर आणि अड.आदर्श गेडाम यांनी घटनेचे विविध कलमाचे महत्व नागरीकांची कर्तव्य आणि जबाबदारी यावर मार्गदर्शन केले .

  कार्यक्रमाचे संचलन, जी एन मेश्राम, एस.एल.बन्सोड तर आभार प्रदर्शन जेष्ठ शिक्षक आर.पी.चौधरी यांनी मानले.

      कार्यक्रम दरम्यान होन्डा शोरुम च्या वतीने शोरूम चे संचालक उमेश गेडाम यांच्या कडुन होतकरु विद्यार्थांना 100 नोटबुक व बालपेन भेट दिण्यात आली ,तसेच भारतीय जनता पार्टी शाखा सावलीच्या वतीने भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकाची फोटो फ्रेम विद्यालयाला भेट म्हणून दिली ,

    कार्यक्रमात पर्यवेक्षक एम डी लाकडे,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, व विद्यार्थी ,स्थानिक नागरिक उपस्थित होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here