सरदार पटेल महाविद्यालय येथे रसायनशास्त्र विभागात अतिथी व्याख्यान संपन्न
अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
मो:8830857351
चंद्रपूर, 24 नोव्हेंबर: सरदार पटेल महाविद्यालयातील रसायनशास्त्र पदव्यूत्तर विभागातर्फे प्रथम सत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमातील कठीण घटकांवर आधारित अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. हिवाळी सुट्टीनंतर प्रथम दिवशी हे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी वियानी महाविद्यालय, अमरावती येथून निवृत्त झालेले व सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेले. डॉ. वासुदेव एस. मराठे यांना व्याख्यानासाठी निमंत्रित करण्यात आले होते. दिवसभर चाललेल्या या व्याख्यान शृंखलेत क्रिस्टल फिल्ड थेअरी हया विषयावर प्रथम सत्रात व मॉलेकुलर आर्बीटल थेअरी फॉर कोऑर्डीनेशन कंपाऊड ह्या विषयावर व्दितीय सत्रात सरांनी दृकश्राव्य माध्यम व पारंपारीक पद्धतीने प्रकाश टाकला. ह्या व्याख्यानाचा लाभ चंद्रपूरातील इतर रसायनशास्त्र पदव्यूत्तर विभागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना घेता यावा यासाठी त्यांना सुद्धा उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली होती. परीक्षेच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी हे व्याख्यान अतिशय उपयुक्त ठरेल असा आशावाद विद्यार्थ्यानी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला प्राचार्य प्रमोद काटकर यांच्या अध्यक्षतेखाली छोटेखानी उद्घाटन सोहळा घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयातर्फे असे शैक्षणिक उपक्रम नेहमीच राबवले जातात असे त्यांनी नमुद केले. रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार यांनी रसायनशास्त्रातील कठीण घटक समजावून घेण्यासाठी अनुभवी व प्रामाणिक प्राध्यापक म्हणून नाव लौकिक असलेल्या डॉ. मराठे सरांच्या व्याख्यांनाचा विद्यार्थी आणि उदयोन्मुख प्राध्यापक यांना नक्की लाभ होईल असे नमुद केले.
याप्रसंगी प्राचार्यांयांच्या हस्ते आठवण भेट देवून डॉ. मराठे यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक सुनिल चिकटे यांनी केले. संस्थेच्या अध्यक्षा सुधाताई पोटदुखे, सचिव प्रशांत पोटदुखे, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दिक्षीत आणि मंडळाच्या सदस्यांनी उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी, संतोष शिंदे. नरेश लोडेल्लीवार, राहुल येलमुले, राजेश इंगोले, गुरूदास शेंडे, हरिदास देठे, शिल्पा ठोबरे, भारती वासेकर यांनी परीश्रम घेतले याप्रसंगी रसायनशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते.