तळा तालुक्यात इलेक्ट्रिक डी पी (ट्रान्स्फार्मर) चोरी करणारी चोरटे सक्रिय

तळा तालुक्यात इलेक्ट्रिक डी पी (ट्रान्स्फार्मर) चोरी करणारी चोरटे सक्रिय

तळा तालुक्यात इलेक्ट्रिक डी पी (ट्रान्स्फार्मर) चोरी करणारी चोरटे सक्रिय

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

रायगड :=रायगड जिल्ह्यातील तळा पोलीस ठाणे हद्दीत महावितरण कंपनीचे ट्रान्स्फार्मर मधील कॉईल चोरून नेणारी टोळी सक्रिय झाल्याचं उघड झालं आहे. चार दिवसापूर्वी तळा येथील राम मंदिर कडे जाण्याऱ्या रस्त्यालगत मुख्य रस्त्याला असणाऱ्या महावितरण कंपनीच्या ट्रान्स्फार्मरची कोईल चोरटयांनी लंपास केली होती. रस्त्यालगत चालू ट्रान्स्फार्मर असणाऱ्या ट्रान्स्फार्मरची कॉईल चोरीला गेल्याने सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला होता.आता पुन्हा चार दिवसातच टोकार्डे येथील पाणी योजनेला वापरण्यात येणाऱ्या ट्रान्स्फार्मच्या कॉईलची चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्यांकडून फसला आहे. चालू ट्रान्स्फार्मरचा मुख्य वीजप्रवाह बांबूच्या साहाय्याने बंद करून, पोलावरून ट्रान्स्फार्मर खाली ढकलण्यात आला. टोकार्डे गावातील पाणी योजनेत काम करणारा कर्मचारी जेव्हा पम्प सुरु करण्यासाठी गेला, तेव्हा सदरील ट्रान्स्फार्मर खाली पडलेला दिसला, त्याने लगेच गावकर्यांना घडलेला प्रकार सांगीतला.

चोरटयांनी कॉईल काढायचा प्रयत्न केला मात्र ट्रान्स्फार्मर वरील झाकण निघत नसल्याने चोरटे ट्रान्स्फार्मर तसाच टाकून प्रसार झाले. गेल्या काही दिवसांपूर्वी टोकार्डे गावातील याच पाणी योजनेची ४००००/- किमतीची केबल चोरीला गेली होती.ट्रान्स्फार्मर चोरीचे वाढते प्रमाण या कारणाने नागरिक भयभीत झाले आहेत. डीपी चोरीच्या टोळीचा तळा पोलिसांनी परदाफास करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here