शिवसेना कर्जत शहर व आमदार महेंद्र थोरवे फाऊंडेशनकडून इतिहासाचा जागर, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्रीमद् रायगड दर्शन सोहळा, राजधानी किल्ले रायगडावर कर्जतकरांचा उत्साह

शिवसेना कर्जत शहर व आमदार महेंद्र थोरवे फाऊंडेशनकडून इतिहासाचा जागर,
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्रीमद् रायगड दर्शन सोहळा, राजधानी किल्ले रायगडावर कर्जतकरांचा उत्साह

शिवसेना कर्जत शहर व आमदार महेंद्र थोरवे फाऊंडेशनकडून इतिहासाचा जागर, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्रीमद् रायगड दर्शन सोहळा, राजधानी किल्ले रायगडावर कर्जतकरांचा उत्साह
✒️संदेश साळुंके✒️
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333📞

त्रिपुरारी पौर्णमेनिमित्त शिवसेना कर्जत शहर व आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या यांच्या माध्यमातून श्रीमद् किल्ले रायगड दर्शन मोहिमेचे आयोजन कर्जत शहरातील नागरिकांसाठी आज दिनांक २६ नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. यानिमित्ताने इतिहासाचा जागर करण्यात आला असला तरी या मोहिमेत तब्बल 1000 कर्जतकर शिवप्रेमींनी सहभाग नोंदवला. या सर्व शिवप्रेमींनी किल्ले रायगड दर्शनासाठी आयोजकांकडून २1 बसेसची सोय करत सर्वांना किल्ले रायगड दर्शन घडवण्यात आले. दरम्यान स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड दर्शन करताना तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
कर्जत तालुक्याला एतिहासिक वारसा लाभला आहे. तर कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून हा वारसा जपण्यासह तो अधोरेखित करण्याचे काम सातत्याने होत आहे. अशात स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे पोहचून सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होत स्वराज्याचा इतिहास अनुभवन ही खूप मोठी पर्वणी असते. मात्र सर्वानाच रायगडावर पोहचणे शक्य होत नाही. मात्र मनात इच्छाशक्ती प्रबळ असते. त्यामुळे कर्जत शहरातील शिवप्रेमींचे हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी शिवसेना शिंदे गट कर्जत शहर व आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून दिनांक २६ रोजी त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधत श्रीमद् किल्ले रायगड दर्शन मोहिमेचे आयोजन कर्जत नगरपरिषदेचे नगरसेवक ॲड. संकेत भासे व शिवसेना कर्जत शहरप्रमुख अभिषेक सुर्वे यांनी इतिहास संशोधक व अभ्यासक सागर सुर्वे यांच्या सहकार्याने आयोजित केली होती.
या मोहिम कर्जत शहर मर्यादित होती तर मोहिमेत सहभागी होण्यासाठी १९ नोव्हेंबर पर्यंत नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र १९ नोव्हेंबर पर्यंत कर्जत शहरातून तब्बल १००० शिवप्रेमी यांनी नोंदणी केली. आज दिनांक २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ५ वाजता या मोहिमेची सुरुवात झाली. १००० शिवप्रेमी कर्जतकरणा घेऊन तब्बल २१ बस रायगडच्या दिशेने निघाल्या. या मोहिमेत सर्व नागरिकांना नाष्टा, जेवण, पाणी चहा याची सोय आयोजकांनी केली. तर या मोहिमेत तरुणांसह ज्येष्ठ नागरिक देखील मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्याने ज्येष्ठ नागरिकांना रोप वे ने गडावर पाठवण्याची व्यवस्था देखील आयोजकांनी केली होती. तसेच दोन रुग्णवाहिकेसोबत डॉक्टर आणि आरोग्य व्यवस्था देखील सोबत सज्ज ठेवण्यात आली होती.
दरम्यान गडावर पोहचल्यावर सर्व शिवप्रेमींना येथील परिसर आणि ऐतिहासिक माहिती सागर सुर्वे यांनी दिली. तर आमदार महेंद्र थोरवे यांनी स्वतः उपस्थित राहत सर्व नागरिकांसोबत रायगड दर्शन केले. तसेच शिवसेना कर्जत व आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन यांच्यामुळे पहिल्यांदाच रायगड दर्शन झाल्याने अनेकांनी त्यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here