पारनेरमध्ये गारपीट व मुसळधार पावसामुळे बळीराजाचे प्रचंड नुकसान, आमदार निलेश लंके सकाळी ७ वाजताच पाहणीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर…

अक्षय पवार

अहमदनगर: आधीच दुष्काळी तालुका व त्या तालुक्यावर वारंवार येणारे नैसर्गिक संकटे .यामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला आहे .रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे व गारपीटी मुळे पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झाले .

पोटच्या पोरागत सांभाळणारे पीक काही वेळातच उध्वस्त झाले .आमदार लोकनेते निलेशजी लंके साहेबांनी तात्काळ महसूल विभाग व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करत पंचनामे करण्याची आवाहन केले . बळीराजा वर आलेले हे अस्मानी संकटा मुळे व मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी पुत्र असणारे आमदार लोकनेते निलेशजी लंके साहेब हे ही रात्रभर झोपू शकले नाही .पूर्ण मतदार संघातून रात्रभर पावसाची व नुकसानीची अपडेट घेत राहिले व सकाळी साडेपाच वाजता घर सोडून दिवस उगवायला शेतकऱ्याच्या बांधावर गेले.

शेतकरी बांधवांचे झालेले अतोनातून नुकसान पाहता भावनावश झालेले आमदार आज पुनश्च एकदा सकाळी सकाळी शेतकऱ्याच्या बांधावर पाहायला मिळाले.

पारनेर तालुक्यातील पानोली, वडूले, सांगवी सुर्या, जवळे, निघोज, करंदी, वडझिरे, चिंचोली, हंगा, वडनेर हवेली, राळेगणथेरपाळ, पिंपळनेर, गुणोरे, गांजीभोयरे, जातेगांव, म्हसणे सुलतानपुर, गटेवाडी, पठारवाडी,लोणीमावळा या भागात गारपीटी मुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली असून या नैसर्गिक आपत्तीमुळे,  शेतमालाचे, घरांचे, गुरांचे, कुकुट पालन व्यावसायिकांचे व इतर बाबींचे ही बरेच नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here