अलिबाग तालुक्यातील रांजणखार येथील जयवंत पाटील यांचे ६५ वे विक्रमी
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: रक्तदान हे श्रेष्ठदान याची अंमलबजावणी केल्याने समाजातील व्यक्तीला जीवनदान प्राप्त होते. म्हणून अलिबाग तालुक्यातील रांजणखार येथील जयवंत कृष्णा पाटील यांनी आतापर्यंत अनेक वेळा रक्तदान केले आहे.
२६/११/२००८ रोजी मुंबईत झालेल्या भ्याड हल्ल्यातील शहिदांना समर्पित रक्तदान शिबीर दि.२६/११/२०२४ रोजी Ex.N.C.C. Cadets Association व सिव्हिल हॉस्पिटल रक्तपेढी यांच्या सहकार्याने गावदेवी मंदिर, रामनाथ, अलिबाग येथे आयोजित केले होते.या रक्तदान शिबिरात जयवंत पाटील यांनी *६५ वे रक्तदान* केले.
यावेळी NCC Cadets चे श्री.वाणी सर व सिव्हिल हॉस्पिटलच्या रक्त संक्रमण अधिकारी डॉ. गोसावी यांनी त्यांना प्रमाणपत्र देऊन त्याचे गौरव व अभिनंदन केले.
जयवंत कृष्णा पाटील हे रांजणखार येथील रहिवाशी असून
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे येथून रिटायर्ड झाले असून आता ५९ वर्षे वय सुरू आहे. त्यांनी मरणोत्तर नेत्रदानही केले आहे .
यापुढेही रक्तदानाची ही सेवा अविरतपणे या देहाकडून घडवून घ्यावी अशी त्यांनी अपेक्षा या वेळी व्यक्त केली आहे.त्याच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.