ज्येष्ठ नेते डॉ. हारूणभाई इनामदार व नगराध्यक्षा डॉ.सौ. सीताताई बनसोड यांच्या पुढाकाराने कार्यक्रम
केज/प्रतिनिधी: भारतीय संविधान दिना निमित्त केज शहरातील फुलेनगर येथील जे.के. फंक्शन हॉलमध्ये संविधान दिनाचा भव्य गौरव सोहळा उत्साहात पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात संविधानाची उद्देशिका सामूहिकरित्या वाचून करण्यात आली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते डॉ. हारूणभाई इनामदार व केज नगर पंचायतच्या नगराध्यक्षा डॉ.सौ. सीताताई बनसोड यांच्या पुढाकाराने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमात नगरसेविका पद्मिनी अक्का शिंदे,पत्रकार श्रीकांत जाधव,अशोक गायकवाड,प्रियांका लांडगे तसेच शिक्षिका भुसारे मॅडम,बोदणे मॅडम, आंधळे मॅडम,गायके मॅडम यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून संविधानातील मूलभूत मूल्यांची जपणूक करण्याचे आवाहन केले.
विशेष म्हणजे,या कार्यक्रमाला केज शहरातील बहुसंख्य महिलांनी उपस्थिती दर्शवून संविधान दिन सोहळा अधिक भव्य केला.महिलांच्या सक्रिय सहभागामुळेकार्यक्रमाला विशेष उत्साह व ऊर्जा प्राप्त झाली.मान्यवरांनी आपल्या भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान,नागरिकांचे हक्क व कर्तव्ये,तसेच संविधानातील समता, स्वातंत्र्य,बंधुता व न्याय या मूल्यांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोंचवण्याचे आवाहन केले.









