देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतःचे हक्क आणि अधिकार देणारा पवित्र ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान हे – ॲड.दयानंद लोंढाळ
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. दयानंद लोंढाळ तर प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका मनीषा शिंदे मॅडम व रंजना माळी मॅडम या होत्या.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले तर भारतीय संविधानाविषयी शाळेच्या क्रीडा विभाग प्रमुख प्रिती कलस्कर मॅडम व सांस्कृतिक विभाग प्रमुख सुषमा मगर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन ईश्वरी शिंदे मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन अंजली शिरसाट मॅडम यांनी केले.









