आरपीआय पनवेल शहराध्यक्ष निलेश सोनवणे यांनी आयोजित केलं महानगरपालिका सफाई कर्मचारी आरोग्य शिबीर

45

आरपीआय पनवेल शहराध्यक्ष निलेश सोनवणे यांनी आयोजित केलं महानगरपालिका सफाई कर्मचारी आरोग्य शिबीर

संविधान गौरव दिन व लोकनेते रामशेठ ठाकूर वाढदिवस अमृत महोत्सवी वर्षाच औचित्य साधून केलं आयोजन

कृष्णा गायकवाड
तालुका प्रतिनिधी
9833534747

पनवेल: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पनवेल शहर अध्यक्ष निलेश सोनवणे आयोजित संविधान गौरव दिन व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवस अमृत महोत्सव वर्षानिमित्त पनवेल महानगरपालिका सफाई कर्मचारी यांच्यासाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर उपस्थित राहणार असून. आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रम पाटील, आरपीआय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, पनवेल महानगरपालिका क्षेत्र अध्यक्ष प्रभाकर कांबळे, जिल्हा प्रवक्ते मोहन गायकवाड, प्राचार्य बी एस माळी, ॲड .मनोज भुजबळ,आरपीआय जिल्हा संपर्कप्रमुख राहुल सोनवणे, सुमित मोरे, तसेच माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, माजी नगरसेवक गणेश कडू, माजी नगराध्यक्ष सुनील घरत ,माजी नगराध्यक्ष संदीप पाटील व पनवेल महानगरपालिका उपायुक्त वैभव विधाते, आरोग्य निरीक्षक अरुण कांबळे यांसह पालिका अधिकारी व कर्मचारी वर्ग, व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून सर्व कामगारांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन निलेश सोनवणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.