अकरा वर्षाच्या सार्थक मोरे चा तलावात बुडून दुर्देवी मृत्यु..

462

अकरा वर्षाच्या सार्थक मोरे चा तलावात बुडून दुर्देवी मृत्यु..

मोरे कुटुंबावर दुखाचे डोंगर…

म्हसळा: संतोष उध्दरकर.

म्हसळा: म्हसळा तालुक्यातील चिराठी या गावचे रहिवाशी संदेश मोरे व त्यांचे कुटुंब नोकरी निमित्त ठाणे जिल्हयातील विरार, पुलपाडा ईथे रहात असुन त्यांना दोन मुले असुन त्यातील सार्थक मोरे वय वर्षे अकरा हा शाळेतुन येऊन सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घराजवळ असणाऱ्या तलावा लगत खेळत असतांना अचानक तोल जाऊन तलावात पडल्याने सार्थकचा बुडुन दुर्दैवी मृत्यु झाल्याने मोरे कुटुंबावर दुखाचे डोंगर कोसळले, या दुर्दैवी घटनेने संपुर्ण पुलपाडामध्ये शोकाकुळ वातावरण झाले असून सर्व ठिकाणी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दि. २७ नोव्हे रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मोरे यांच्या चिराठी येथील राहत्या घरी सार्थक याचा अंत विधी करण्यात आला, संपूर्ण चिराठी गाव संदेश मोरे यांच्या दुखात सहभागी झाले असून चिराठी गावात देखील शोकाकुळ वातावरण निर्माण झाले आहे.