रेवदंडा–साळाव पुलाच्या कामाला सुरुवात

79

रेवदंडा–साळाव पुलाच्या कामाला सुरुवात

विकासाला नवी गती — दमदार नेतृत्वाची फलश्रुती

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- रेवदंडा ते साळाव दरम्यानच्या महत्त्वाकांक्षी पुलाच्या कामाला अखेर अधिकृत सुरुवात झाली असून स्थानिक नागरिकांच्या दीर्घकाळच्या प्रतीक्षेला आज प्रतीक्षित दिवस लाभला आहे.
या पुलामुळे रेवदंडा–साळाव परिसरातील वाहतूक सुलभ होणार असून आपत्कालीन सेवा, शैक्षणिक तसेच व्यावसायिक हालचालींना मोठा वेग मिळणार आहे.
आज या पुलाच्या कामाचे सुरुवात अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष आंनत गोंधळी, सचिन राऊळ, सरपंच प्रफुल्ल मोरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
या प्रकल्पाच्या मागील काळात सातत्याने पाठपुरावा करून कामाला गती देण्याचे प्रयत्न आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी केले. प्रशासकीय अडथळे दूर करणे, निधी उपलब्धता सुनिश्चित करणे आणि तांत्रिक प्रक्रियांना गती देणे या सर्व पातळ्यांवर त्यांच्या सक्रिय भूमिकेमुळेच हे काम प्रत्यक्ष सुरू होऊ शकले, असे स्थानिकांनी नमूद केले आहे.

पुलाच्या सुरू झालेल्या कामामुळे रेवदंडा, साळाव तसेच आजूबाजूच्या गावांच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून या भागातील रस्ते–वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे.
स्थानिक नागरिक, व्यावसायिक व प्रवासी यांनी या कामाच्या प्रारंभाचे स्वागत केले आहे.