जिल्हाधिकारानी ऊस दरा संदर्भात घेतलेल्या बैठकीमध्ये फक्त चर्चा ठोस निर्णय नाही, आंदोलन सुरूच..
बीड ( प्रतिनिधी ): बीड जिल्ह्यामध्ये जवळपास बीड जिल्ह्यामध्ये महिनाभरापासून जवळपास जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने चालू झाले आहेत गुळ उद्योग देखील सुरू झाले आहेत. जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटनेने एकत्र येत शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून दोन रस्ता रोको आंदोलन केले लेखी आश्वासनाच्या नंतर आंदोलन स्थगित करून जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकारी, साखर कारखानदार व शेतकरी संघटनेचे प्रतिनिधीची बैकठ दिनांक २५ रोजी ५ वाजता जिल्हाधिकारी सभागृहामध्ये पार पाडली मात्र या बैठकीमध्ये इतर प्रश्नावर चांगली चर्चा झाली इतर प्रश्न मार्गी लागले. मात्र या वर्षी पहिला ऊस बिलाचा हप्ता किती देणार या संदर्भामध्ये ठोस निर्णय झालेला झाला नसल्यामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या आंदोलन चालू राहणार असल्याची माहिती शेकापचे नेते भाई मोहन गुंड यांनी दिली आहे
जिल्ह्यातील अजून एक ही साखर कारखाननी आपण पहिला हप्ता कितीने काढणार आहेत अजून गुपित आहे, एक तर कारखान्यांनी 14 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना गाळप झाल्यापासून बिल देणे बंधनकारक आहे, हा नियम देखील कारखानदारांनी जवळपास नियमाचे पालन केलं नाही. कारखाना सुरू करण्याआधी आपण काय भाव देणार याची घोषणा करणे गरजेचे असताना देखील सर्व संचालक भ्र शब्द काढत नाहीत, चांगला भाव देऊ असे घोळक सर्वच कारखान्याचे संचालक बोलत आहेत, मनात पाप नसेल तर घोषणा करून तात्काळ पहिला ऊस गाळपाचा हप्ता कितीने देणार लेखी स्वरूपाचे पत्र कारखानदारांनी काढावे, एकतर शेतकरी रिकवरी मध्ये मध्ये मारला जातो एकाच भागातील कारखाने वेगवेगळे भाव देतात, यामध्ये शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते जिल्ह्यामध्ये जवळपास सात साखर कारखाने चालु झाले आहेत, भाव जाहीर न करणारा साखर कारखाना शेतकऱ्याची पोर चालू देणार नाहीत, याची नोंद साखर कारखानदारांनी आणि प्रशासनाने घ्यावी, आस शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड यांनी प्रसिद्धी पत्रकात दिले,









