सोलापुर अनैतिक संबंधांमध्ये मुलाचा अडसर, आईकडून पोटच्या मुलाचा खून.
सोलापुर:- अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या 22 वर्षीय युवकाचा जन्मदात्या आईने व तिच्या प्रियकरानेच कट रचून खून केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात मुक्ताबाई जाधव 45 आणि तात्या कदम 35 यांचे अनैतिक संबंध होते. या संबंधांना मुक्ताबाई जाधव यांचा मुलगा सिद्धेश्वरचा विरोध होता. शुक्रवारी सिद्धेश्वर झोपेत असताना मुक्ताबाई आणि तिचा प्रियकर तात्याने मिळून त्याच्या डोक्यात दगड घातला आणि त्याचा खून केला. खून केल्यानंतर त्याचा मृतदेह जवळच्या शेतात टाकला.
ग्रामस्थांना सिद्धेश्वरचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांना पाचारण केले. पोलिसआंनी मृत सिद्धेश्वरच्या आईची चौकशी केली असता तिने गुन्हा कबुल केला. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.