डोंबिवली आई-बहिणीला वाचवण्यासाठी तरुणीने खदानीत मारली उडी, दोघी वाचल्या पण लावण्या पाण्यात बुडाली.

यामध्ये आई आणि लहान मुलीला वाचवण्यात यश आलं असून मोठी मुलगी पाण्यात बुडाल्याचं सांगण्यात येत आहे.

डोंबिवली :- डोंबिवली कोळेगाव परिसरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. इथे एका खदानीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या आई आणि दोन मुली पाण्यात बुडाल्याची माहिती समोर येत आहे. अधिक माहितीनुसार, आई दोन मुलींसह कपडे धुण्यासाठी खदानीत गेली असता लहान मुलगी पाण्यात बुडाली. तिला वाचवण्यासाठी आईने पाण्यात उडी घेतली. धक्कादायक बाब म्हणजे या दोघींनी वाचवण्यासाठी मोठ्या मुलीनेही पाण्यात उडी घेतली. यामध्ये आई आणि लहान मुलीला वाचवण्यात यश आलं असून मोठी मुलगी पाण्यात बुडाल्याचं सांगण्यात येत आहे.

आई गीता आणि मुली परी वय 4 वर्ष आणि लावण्या वय 16 वर्ष अशी पाण्यात बुडालेल्या मायलेकींची नावं आहे. गीता आपल्या दोन मुलींसह कपडे धुण्यासाठी खदानीत गेली होती. खेळता खेळता लहान मुलगी परीचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडली. अशात आपल्या लेकीला वाचवण्यासाठी पोहता येत नसतानाही गीताने पाण्यात उडी घेतली.

परी आणि गीता दोघींना पाण्यात पोहता येत नसल्याने लावण्या घाबरली आणि तिने त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. लावण्याने मोठा हुशारीने आई आणि परीचा जीव वाचवला पण दुर्देवाने ती पाण्याच्या प्रवाहात अडकल्याची माहिती देण्यात आली आहे. मानपाड पोलीस सध्या घटनास्थळी लावण्याचा शोध घेत असून आई गीता आणि बहिण परी सुखरुप असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांची मोठी टीम खदानीत लावण्याचा शोध घेत आहेत. आई आणि बहिणीला वाचवून स्वत: मात्र पाण्याच्या प्रवाहात बुडाल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here