टॉप १०: २०२१ वर्षातील सर्वोत्तम रेटिंग मिळालेले भारतीय चित्रपट

60

best bollywood movies of 2023

सिद्धांत
२७ डिसेंबर २०२१: २०२० प्रमाणे २०२१ वर्षे देखील लॉकडाऊन आणि निर्बंधांच्या सावटाखाली सरून गेलं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून सावरल्यानंतर कित्येक महिने बंद असलेली सिनेमागृहे मर्यादित क्षमतेने उघडली खरी, प्रेक्षकांची पावले कोरोनाच्या भीतीने सिनेमागृहांकडे तितकीशी वळली नाहीत.

परंतु ह्यावर्षी नेटफ्लिक्स, ऍमेझॉन सारख्या ऑनलाईन ओटिटी प्लॅटफॉर्मनी मात्र प्रेक्षकांना आपल्याकडे खेचून घेण्यात यश मिळवले. देशभरातील वेगवेगळ्या भाषांतील अनेक चित्रपट ह्यावर्षी ओटिटी प्लॅटफॉर्म रिलीझ झाले आणि प्रेक्षकांनी घरबसल्या त्या चित्रपटांचा आस्वाद घेतला.

भारतामध्ये दर वर्षाला १००० हुन जास्त सिनेमा रिलीझ केले जातात. चला तर मग ह्यावर्षी रिलीझ झालेल्यापैकी सर्वोत्तम रेटिंग मिळालेले आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेले चित्रपट कोणते ते पाहू.

Jai Bhim – तामिळ
९.४
पोलीस कस्टडीमध्ये असताना हरवलेल्या आपल्या पतीला शोधण्याचा प्रयत्न करणारी महिला आणि तिला मदत करणारा एक वकील यांची कथा या चित्रपट मांडलॆली आहे. भारतातील जातीभेद आणि न्यायव्यवस्थेमध्ये त्याचा होणार परिणाम या चित्रपटामध्ये मांडलेला आहे.

Jai-bhim-movie

Home – मल्याळम

आधुनिक तंत्रज्ञानाच्या दुनियेत पारंगत नसलेल्या एका मिडल क्लास कुटुंबातील वडिलांच्या आणि त्यांच्या मुलांच्यामधील नातेसंबंध दाखवणारी हि एक इमोशनल – कॉमेडी फिल्म आहे.

home-movie

Maanaadu – तामिळ

हि तामिळ भाषेतील एक साय-फाय ऍक्शन फिल्म आहे. एक सामान्य माणूस आणि एक पोलीस ऑफिसर टाइम लूप मध्ये अडकल्यावर काय होते याचा थरार या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळतो.

Sardar Udham – हिंदी
८.८
१९१९ मध्ये झालेल्या जालियानवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी माइकल ओड्वायर यांचा वध करणाऱ्या सरदार उधम सिंग यांचा जीवनपट या चित्रपटात दाखवलेला आहे.

Sarpatta Parambarai – तामिळ
८.७
१९७०च्या दशकात मद्रासमध्ये राहणाऱ्या एका बॉक्सरच्या जिद्दीची कथा प्रसिद्ध दिग्दर्शक पा. रणजित यांनी आपल्या चित्रपटात  आहे.

Shershaah- हिंदी
८.७
कारगिल युद्धामध्ये शाहिद झालेल्या विक्रम बात्रा यांचा जीवनपट शेरशहा या हिंदी सिनेमामध्ये मांडलेला आहे.

Minnal Murali – मल्याळम
८.६
अलीकडेच प्रदर्शित झालेली हि फिल्म मल्याळम भाषेतील एक सुपरहिरो फिल्म आहे. अंगावर वीज पडून मिळालेल्या खास शक्तीचा वापर करून सुपरहिरो बनणाऱ्या एका व्यक्तीची कथा प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळते.

Mandela – तामिळ
८.५
एका छोट्या गावातील निवडणूक जिंकण्यासाठी दोन राजकीय पक्षांच्या कुरघोड्या चालू असतात. यावेळी निर्णायक मताची जबाबदारी गावातील एका सामान्य न्हाव्यावर येऊन ठेपते. त्यातून घडणाऱ्या गमतीजमती या चित्रपटात मांडलेल्या आहेत.

Drushyam 2 – मल्याळम
8.4
२०१३ मध्ये आलेल्या — या चित्रपटाचा हा सिक्वेल असून चित्रपटात सहा वर्षानंतरचे कथानक दाखवले आहे. पोलीस, गुन्हेगार यांच्या विळख्यात सापडलेल्या एका कुटुंबाची कथा या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळते.

Nayattu – मल्याळम
८.१
भ्रष्टाचारी वरिष्टांकडून फसवणूक झाल्यानंतर अटक टाळण्यासाठी फरार झालेल्या तीन पोलिसांची कथा आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळते.