Happy Birthday Salman Khan
सिद्धांत
२७ डिसेंबर २०२१: सलमान खान, बॉलिवूडच्या दुनियेचा बेताज बादशाह. आपल्या तीन दशकांपेक्षा दीर्घ कारकिर्दीची सुरुवात सलमान खानने सध्या सरळ रोमँटिक हिरो म्हणून केली होती. आज या इमेजबरोबरच एक ऍक्शन स्टार म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. लोकप्रियता आणि चाहत्यांचे प्रेम यागोष्टींमध्ये सलमान खान बाकीच्या सेलेब्रेटींपेक्षा दोन पाऊले पुढेच राहिला आहे. लोकप्रियतेच्या अतिउच्च शिखरावर असताना अनेक वादग्रस्त घटनांमध्ये, कोर्ट-कचेऱ्यांमध्ये सलमान खान अडकला आहे. त्यामुळे जितके प्रेम त्याला चाहत्यांकडून मिळाले, त्याचबरोबर समीक्षकांकडून त्याच्यावर टीका ही झाली. या साऱ्या प्रवासात सलमान खानने आजवर १२५ पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे.
लाईट, कॅमेरा अँड ऍक्शनच्या चक्रव्यूहामध्ये राहणाऱ्या सलमान खानने आपल्यात दडलेला एक चित्रकार मात्र अजूनही जिवंत ठेवला आहे. कधी साध्या कागदावर चाहत्यांना ऑटोग्राफ देताना, कधी आपल्या पनवेलच्या फार्महाउसच्या भिंतीवर, तर कधी लाईव्ह स्टेजवर सुद्धा सलमान खान आपल्या वेगळ्या शैलीतील चित्र काढताना दिसला आहे. सलमानच्या खान अशीच काही चित्रे:
सलमान खानच्या चित्रकलेमध्ये बुद्धिस्ट तत्त्वज्ञानाचा फार मोठा प्रभाव दिसून येतो. आजवर अनेक चित्रांमध्ये सलमान खानने बुद्धाला चितारीत केले आहे.
त्याचबरोबर सलमान खानने ख्रिस्त, शंकर, गणपती यासारख्या देवतांची चित्रे काढली आहेत. या चित्रात सर्वधर्म समभावचा संदेश दिसून येतो.
बऱ्याचदा चित्रपटाच्या सेटवर असतानासुद्धा वेळ काढून सलमान खान चित्र काढत असतो. फिल्मी जगतातील अनेक कलाकारांना त्याने आपली पेटिंग्स भेट म्हणून दिली आहेत. त्यामध्ये अमीर खान, बोनी कपूर, रणबीर कपूर यांचा समावेश आहे. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीने सलमान खानने मला दोन पेटिंग्स भेट म्हणून दिल्याचे सांगितले होते.
एकदा तर एका लाईव्ह शोमध्ये कागदाच्या अवघ्या १० मिनिटात सलमानने शंकराचे स्केत्च काढून दाखवले होते. सलमान खान आपली चित्र फारसी विकण्यासाठी प्रदर्शनात लावत नाही, आणि कधी लावलीच तर त्यातून मिळालेले पैसे हे आपल्या बीइंग ह्यूमन या चॅरिटीला दान करतो. अलीकडेच सलमानची एक पेटिंग तब्बल २.५ कोटीला विकले गेले होते.