आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा- २०२१ मध्ये कैलास राखडे ला रजत पदक

अरुण रामुजी भोले
*नागभिड तालुका प्रतिनिधि*
*9403321731*
नागभिड : – हैद्राबाद येथे आयोजित ३ री जीएसकेडीआय आंतराष्ट्रीय खुली कराटे चॅम्पियन स्पर्धा – २०२१ मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय , नागभीड येथील बी . ए . भाग तृतीय वर्षाचा विद्यार्थी कैलास पुरुषोत्तम राखडे याने रजत पदक ( सिल्वर मेडल ) प्राप्त करून महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला .
हि स्पर्धा कराटे असोसिएशन ऑफ इंडिया आणि वैश्विक शोतोकान- दो इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने दि . १७ ते १ ९ डिसेंबर २०२१ रोजी हैद्राबाद , तेलंगाना येथे आयोजित करण्यात आली होती . या स्पर्धेमध्ये संपूर्ण जगभरातील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता . त्यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय, नागभीड येथील बी . ए . भाग तृतीय वर्षाचा विद्यार्थी कैलास पुरुषोत्तम राखडे याने २१ ते २५ वयाच्या गटातून रजत पदक ( सिल्वर मेडल ) प्राप्त केला .
कैलास राखडे याने आपले प्रशिक्षण शावलीन कुंगफू , नेरी या संस्थे अंतर्गत पूर्ण केले असून संपूर्ण देशातून या स्पर्धेमध्ये रजत पदक प्राप्त करून महाविद्यालयाचे नाव सुवर्ण अक्षराने कोरले आहे हि महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे .
या पुरस्काराबद्दल संस्थेचे सचिव मनोजभाऊ वनमाळी व संस्थेचे पदाधिकारी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य , डॉ . अनिल एन . कोरपेनवार महाविद्यालयीन समस्त प्राध्यापकवृंद , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.