पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी होळकर यांच्या पुतळ्याचे आगमन

70

पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी होळकर यांच्या पुतळ्याचे आगमन

पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी होळकर यांच्या पुतळ्याचे आगमन
पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी होळकर यांच्या पुतळ्याचे आगमन

नामदेव धनगर
धुळे जिल्हा प्रतिनिधी
मिडिया वार्ता न्यूज
मो.नं.9623754549

दोडाईचा शहरात माजी केंद्रीय पर्यटन मंत्री व आमदार श्री जयकुमार रावल यांच्या स्थानिक विकास निधीतून राणीपुरा होळी चौक याठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णकृती पुतळा बसवला जात आहे त्या पुतळाचे शहरात आगमन झाले अहिल्यादेवी या शिव भक्त होते म्हणून त्यांची स्वागत मिरवणूकीची सुरूवात शिव मंदिरांपासुन सुरू करण्यात आली कालचा दिवस धनगर समाजासाठी खुप आनंदाचा दिवस होता गाव दरवाजातून आझाद चौक मार्ग , गणपती मंदिर धनगर वाडा होळी चौक याठिकाणी भूमिपूजन करण्यात आले आणि गोपालपुरात स्वागत शोभायात्राची सांगता करण्यात आली अहिल्या मातेचं चौका-चौकात आरती करून फुलांची उधळण करून दर्शन घेतले तर गोपालपुरात समाज बांधवांनी फटाक्यांची आतिशबाजी करून अदभुतपूर्व स्वागत केले सर्व शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते . धनगर समाजांनी जे स्वप्न पाहिले होते ते पुर्ण झाले या पुर्णकृती पुतळा बसवल्याने समाजाला प्रेरणा मिळेल या स्वागत शोभायात्रेत आमदार श्री जयकुमार रावल शेवटपर्यंत थांबले हे विशेष या स्वागत शोभायात्रेत संपुर्ण समाज बांधव आणि महिला बघिणी मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या होत्या स्वागत शोभायात्रा शांततेत पार पाडण्यासाठी समाजाचे जेष्ठ आणि तरूण मुलांनी मेहनत घेतली….