वामनपल्ली येथे श्री. दत्त मंदिरात विद्युत जोडणीचे लोकार्पण. आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते उद्घाटन व शुभारंभ.

62
वामनपल्ली येथे श्री. दत्त मंदिरात विद्युत जोडणीचे लोकार्पण. आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते उद्घाटन व शुभारंभ.

वामनपल्ली येथे श्री. दत्त मंदिरात विद्युत जोडणीचे लोकार्पण.

आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते उद्घाटन व शुभारंभ.

वामनपल्ली येथे श्री. दत्त मंदिरात विद्युत जोडणीचे लोकार्पण. आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते उद्घाटन व शुभारंभ.
✍️स्वीटी गेडाम ✍️
चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी
मो.7498051230

गोंडपीपरी (ता. प्र) :– गोंडपीपरी तालुक्यातील मौजा वामनपल्ली येथील श्री. दत्त मंदिरात विद्युत जोडणी कामाचे लोकार्पण श्री. दत्त जयंतीच्या पावन पर्वावर लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी गोंडपीपरी यांच्या सौजन्याने व आ. धोटे यांच्या पाठपुराव्यामुळे या विकासकामाचा शुभारंभ इथे संपन्न झाला. श्री. दत्त मंदिर देवस्थान व लाठी ग्रामपंचायत च्या वतीने आ. सुभाष धोटे यांच्या सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटक आ. सुभाष धोटे, अध्यक्ष लाठीचे सरपंच विनोद जगताप, प्रमुख अतिथी पोळसाचे सरपंच देविदास सातपुते, लाठीचे उपसरपंच साईनाथ कोडापे, लाठीचे ग्रा. प. सदस्य सुमनबाई गेडाम, शालूताई तलांडे, सुनिल चावरे, सुमनबाई मडावी, संगीताबाई चौधरी यासह स्थानिक नागरिक, श्री. दत्त मंदिर देवस्थानचे पदाधिकारी, भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.