विहिरीत पडलेल्या बिबट्याचे यशस्वी रेस्क्यु

45
विहिरीत पडलेल्या बिबट्याचे यशस्वी रेस्क्यु

विहिरीत पडलेल्या बिबट्याचे यशस्वी रेस्क्यु

विहिरीत पडलेल्या बिबट्याचे यशस्वी रेस्क्यु

वनविभागाकडून मिळाले जिवनदान, सिन्देवाही वनपरिक्षेत्रातील घटना

जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही तालुका प्रतिनिधी :
मो 880689909
सिंदेवाही :- वनपरिक्षेत्रातील नवरगाव उपवनक्षेत्रात येत असलेल्या देवाळा शेतशिवा रातील विहीरीत बिबट पडल्याने नागरीकांनी बघण्यासाठी मोठी गर्दी केली अशाही स्थितीत त्या बिबट्याला विहिरी बाहेर काढणे मोठे आव्हान वनविभागा समोर असतांना त्याला सुखरूप बाहेर काढून जिवदान दिल्याने वन्यप्रेमी वनविभागाचे कौतुक करीत आहेत.

सिंदेवाही वनपरिक्षेत्र हा ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला लागून असल्याने ह्या वनपरिक्षेत्रात नेहमी वन्यप्राण्याचे दर्शन होत असते. वाघ, बिबट, डूक्कर यांची संख्या भरमसाठ वाढल्याने गाव खेड्यातील नागरीकांना यांचा

नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशातच नवरगाव उपवन क्षेत्रातील देवाळा शेत शिवारात असलेल्या विठोबा उईके नामक शेतकऱ्याच्या १३४ गट नंबरच्या शेतातील बिना तोंडीच्या विहीरीत शिकारीच्या शोधात असलेला बिबट बुधवार रात्रीच्या सुमारास विहीरीत पडला सदर घटना गुरुवारला सकाळी आठ वाजता उघडकीस आल्याने घटनेची माहिती सिंदेवाही नवरगांव वनविभागाच्या अधिकाऱ्यांना
देण्यात आली. घटनेचे गाभीर्यn ओळखून वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. सदर आव्हान स्विकारत वनकर्म चाऱ्यांनी विहिरी सभोवताल जाळीचे सुरक्षा कवच तयार केले. विहिरीत खाट टाकण्यात आली. त्या खाटेवर दमलेला बिबट सहजच येवून बसला, अशात विहीरीत पिंजरा सोडून त्या बिबट्याला पिंजऱ्यात टाकण्यात आले आणि सुखरूप बाहेर काढून त्याला विश्रांती देण्यात आली.

सदर बिबट्याचे वय १८ महीने ते १ वर्ष असे सांगण्यात येत आहे अशा पद्धतीने विहीरीत पडलेल्या बिबट्याच बिबट्याचे सुखरूप रेस्क्यु केल्याने नागरीकांनी सुटकेचा श्वास सोडला. सदर रेस्क्यु आपरेशन वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर याच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक एस बी उसेंडी वनरक्षक नितेश शहारे, सुरपाम तथा वन वनकर्मचाऱ्यानी पार पाडली.