*रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळे पर्यटकांनी गजबजली*
हॉटेल ८०टक्के फुल्ल; जिल्हा प्रशासन सज्ज
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: नाताळ सण साजरा करण्यासोबत सरत्या नवीन वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी रायगड जिल्हा सज्ज आहे. रायगड जिल्ह्यात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले असून सर्व पर्यटन स्थळे पर्यटकांनी बहरली आहेत. ठीक ठिकाणी मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात व्यावसायिक व्यस्त आहेत. जिल्ह्यातील हॉटेलमध्ये ८०% बुक असल्याने आता आयत्यावेळी बुकिंग करण्यासाठी पर्यटकांना जादा पैसे मोजावे लागत आहेत. पर्यटकांची संख्या वाढल्याने मासळीच्या मागणी वाढ झाली असून मासळीचे दर वाढले आहेत. जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गाची दुरुस्त झाले असून पर्यटकांना निश्चित स्थळी पोहोचण्यासाठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. नव वर्ष स्वागता दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे.
नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी रायगड जिल्ह्याला पसंती असून रायगड जिल्ह्यात पर्यटक दाखल होऊन लागले आहेत. शनिवारपासून पर्यटकांचा संख्येत आणखी भर पडणार आहे. आपल्याकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटनपूरक व्यवसायांनी विविध उपक्रम राबविले आहेत. रायगड जिल्ह्यात नववर्ष स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी पंधरा दिवस आधीच हॉटेल कॉटेज लॉज मधील रूमचे आगाऊ बुकिंग करून ठेवले आहे. प्रमुख पर्यटन स्थळांवरील राहण्याचे बुकिंग याआधी झाल्याने आयत्यावेळी नववर्ष स्वागत साठी रायगड जिल्ह्यात येण्याचे बेत केलेल्या पर्यटना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. यासाठी रूम मिळवताना त्यांच्या नाकी नऊ येत असून हॉटेल कॉटेज लॉज व्यवसायिकांकडून रूम साठी जागा दर आकारले जात आहे. यामुळे पर्यटकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
*मासळीचे दर महागले*
बदलते हवामान वाढते प्रदूषण त्यामुळे समुद्रात पुरेसा प्रमाणात मासे मिळत नसल्याने मच्छीमार सांगतात. त्यातच नव वर्ष स्वागतासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक आले आहेत. यामुळे मासलीच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. मागणीच्या प्रमाणात पुरवठा कमी असल्याने मासेज दर वाढले आहेत. मागील महिन्याच्या तुलनेत ५० ते ६० टक्के मासळीचे दर वाढले आहेत. यामुळे पर्यटकांना मासळीवर ताव मारताना विचार करावा लागत आहे.
*या ठिकाणांना पसंती*
समुद्रकिणारे: अलिबाग, किहीम, वर्सोली मांडवा, काशीद, मुरुड दिवेआगार ,श्रीवर्धन
धार्मिक स्थळे: पाली बनल्यालेश्वर, महड वरद विनायक, हरिहरेश्वर शंकर ,सालाव बिर्ला मंदिर
गड किल्ले: रायगड ,जंजिरा, कुलाबा कोर्लई
थंड हवेचे ठिकाण: माथेरान
*मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था*
अलिबाग मुरुड श्रीवर्धन महाड रोहा तालुक्यातील पर्यटन स्थळांवर पोहोचण्यासाठी पर्यटक मुंबई गोवा महामार्गाचा वापर करीत आहे. मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण्याचे काम रखडले आहे. महामार्गावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. महामार्गावर पडलेल्या खड्डे व वाढलेली वर्दळ यामुळे पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. निश्चित स्थळी पोहोचण्यासाठी पर्यटकांना दीड ते दोन तासाचा जादा अवधी लागत असल्याचे चित्र दिसून येते.
*कडेकोड बंदोबस्त*
नाताळ व सरत्या वर्षाला निरोप देताना अति उत्साह काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रायगड पोलीस दलाकडून कडे कोड बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. सर्व समुद्र किनारे मार्केट परिसर तसेच महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. महिलांची छेडछाड करणाऱ्यांवरून ठेवण्यासाठी दामिनी पथक बीड मार्शल तसेच साध्या गणेशातील पोलीस ठिकठिकाणी नेमले जाणार आहेत. त्यामध्ये होमगार्डचाही सहभाग असणार आहे. पोलीस अधीक्षक कार्यातील राखीव पोलिसांचा बंदोबस्त नेमण्यात येणार आहे.