सामान्यांचे हित जोपासत सावली बनलेले स्वयंभू लोक नेतृत्व – फहीमुद्दीन काझी

29

माणसं जोडण्याची कला आपल्यामध्ये आहेच परंतु मंत्री यांच्याशी असलेले जवळीकही नजरेत भरणारी आहे. त्यामुळेच पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असताना परभणी सारख्या शहरातील आपल्या मतदारांशी एकनिष्ठता ठेवून सामान्य जणांचे हित जोपासण्यासाठी आणि आपल्या वार्डातील विकास कामांना चालना देण्या इतपत संघर्षाची ठिणगी पेटवणारा आणि जनतेप्रतिनिष्ठा ठेवून अनेक प्रश्न कोणतेही राजकीय बळ नसताना सोडवण्याची हिंमत दाखवणारा पैकी आणि काम नियोजनपूर्वक करण्याचा तुमचा पैलू पुन्हा जाणवला तुमच्या वागणुकीतून प्रत्येक वेळी नवीन काहीतरी शिकायला मिळतं.

सदाशिव राऊत 

परभणी – म्हणतात ना टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही. माणसाचंही अगदी तसंच आहे. आयुष्य जगत असताना समोर येणाऱ्या परिस्थितीला तोंड देताना दगडावर लागतं! संघर्ष करावा लागतो झुंजल्या झगडल्या शिवाय कठीण प्रसंगातून मार्ग काढता येत नाही. त्यातही पत्रकारिता म्हणजे सतीच वाण हे वाण शिव करून निर्भीड निष्पक्षपाती पत्रकारिता करणे म्हणजे महा अवघड काम नव्हे तर पाण्यात राहून माशांची वर घेण्यासारखं परंतु अंगी धाडस, धडपड, नाविन्याचा शोध आपण करतोय ते योग्यच. आन , समाजाच्या हिताच आहे हा आत्मविश्वास बाराहत्तीचं बळ देतो! आणि अशा ठाम आत्मविश्वासाच्या बळावर हाती घेतलेलं काम शत: प्रतिशत पूर्ण करायचंच या धद्रड निश्चयाशी स्वभाव गुण फहीमुद्दीन काझी यांनी परभणीकरांना दाखवून दिल.

सागराचा अफाट विस्तार आणि विशाल लाटांसह खोली पाहिल्यावर मनात वेगवेगळ्या कल्पना जन्म घेतात. असाच काहीसा प्रकार स्वयंभू लोक नेतृत्व काजी मोहम्मद फहिमोदीन परभणी शहराचे भूमिपुत्र यांच्या जीवनपटाकडे पाहून वाटल्याशिवाय राहणार नाही. अष्टपैलू दिलखुलास आणि चित्त तरुण व्यक्तिमत्व असलेल्या काजी यांचा जन्म 12 जून 1968 साली परभणीच्या सुभेदार नगर येथे मोहम्मद मोईनोदीन यांच्या उदरी झाला प्राथमिक शिक्षण नगरपालिकेच्या शाळेत रोशन खान मोहल्ला बारादरी परभणी येथे झाले. माध्यमिक शिक्षण डॉक्टर झाकीर हुसेन हायस्कूल मध्ये झाले आणि उच्च शिक्षणासाठी श्री शिवाजी महाविद्यालयामध्ये बीएची पदवी प्राप्त करून राजकीय क्षेत्रात 1995 मध्ये समाजवादी पार्टीच्या माध्यमातून 2004 पर्यंत प्रवास केल्यानंतर पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून 2005 ते आता गाईत राजकारणात सक्रिय आहेत.

समाज हितासाठी पार्टीच्या माध्यमातून धरणे आंदोलने, आमरण उपोषण, रालिया, अनेक आंदोलने गाजवून समाजाचे प्रश्न सोडवण्याचे कार्य घडले आहे. आजतागायत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या असंघटित कामगार विभाग कार्य अध्यक्ष पदावर विराजमान आहेत परभणी महानगरपालिका च्या प्रभाग तेरा मध्ये गेले तीन ते चार वर्षापासून सामाजिक बांधिलकी जपत आपल्या वार्डाचे प्रश्न तत्परतेने शासन प्रशासन दरबारी मांडणारे तिथल्या सर्व सामान्य माणसांना आपल्या घरचे मानून त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणार नेतृत्व एका रात्रीतून घडत नाही सामान्य माणूस वेगवेगळ्या प्रसंगातून जो खून अशा नेतृत्वाला आपलं मानतो आणि त्याच्यावर भरभरून प्रेम करतो. काझी साहेबांचा हा प्रवास वार्ड क्रमांक 13 च्या जनतेने पाहिला आहे आणि ते पूर्ण कशाला उतरल्यावर त्यांना आपलं मानलं आहे. असं नेतृत्व घडण्या साठी दोन अडीच दशक मोडतात, असं असताना आपणच आपल्या माणसाला सामान्य माणसानं बळकटी दिली त्यातूनच वार्डाच्या नेतृत्वानंतर तेच यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

काझी यांच्यावर नजीकच्या च भविष्यात मोठी जबाबदारी आलेली आपल्याला पाहायला मिळेल त्यासाठी आपल्याला फार वाट पहावी लागणार नाही असं आश्वासक वातावरण सध्या दिसत आहे…