नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. १६ सदस्यांच्या या संघाचं नेतृत्व कर्णधार विराट कोहलीकडेच राहणार असून डावखुरा फलंदाज सुरेश रैनाचं टीम इंडियात पुनरागमन झालं आहे. येत्या १८ ते २४ फेब्रुवारी दरम्यान दोन्ही संघात टी-२० मालिका खेळली जाणार आहे.
निवड समितीने टी-२० मालिकेत सुरेश रैनाचा समावेश केल्याने रैनाला या संधीचं सोनं करण्याची आयतीच संधी मिळाली आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यानंतर रैनाला संघातून वगळण्यात आलं होतं. त्यानंतर त्याने उत्तर प्रदेश संघाचा कर्णधार म्हणून मैदान गाजविले होते.