मेलबर्न: स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडररने क्रोएशियाच्या मारिन सिलिचला मॅरेथॉन मुकाबल्यात ६-२, ६-७, ६-३, ३-६ आणि ६-१ असे नमवत आपल्या कारकीर्दीतील २०वा ग्रँड स्लॅम किताब आपल्या नावे केला. मेलबर्नमध्ये झालेल्या आजच्या अंतिम सामन्यात फेडररने पहिला, तिसरा आणि पाचवा सेट आपल्याकडे खेचत विजयाची नोंद केली. याबरोबरच त्याने सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि ऑस्ट्रेलियाचा रॉय एमर्सन यांच्या सहा वेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकण्याच्या रेकॉर्डची बरोबरीही केली. फेडररने ३०व्या वेळा ग्रँड स्लॅमच्या अंतिम सामन्यात धडक देण्याची फेडररची ही ३० वी वेळ होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here