‘पद्मावत’चा विरोध; पेट्रोल बॉम्ब फेकला

100

कल्याण : राजस्थान, मध्यप्रदेश, हरयाणा आणि दिल्लीत पसरलेले ‘पद्मावत’ विरोधाचे लोण आता ठाण्यातही येऊ धडकले आहे. कल्याणच्या भानू सागर थिएटरमध्ये ‘पद्मावत’ चित्रपट दाखविला म्हणून काही अज्ञात समाजकंटकांनी शनिवारी रात्री थिएटरवर पेट्रोल बॉम्ब फेकला. सुदैवानं या हल्ल्यात कोणीही जखमी झालं नाही. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

रात्री ९ वाजून १० मिनिटाने ही घटना घडली. भानू सागर थिएटरमध्ये रात्रीचा खेळ सुरू असताना काही अज्ञात इसमांनी थिएटरबाहेर येऊन पेट्रोल बॉम्ब फेकला आणि घटनास्थळावरून पोबारा केला. बॉम्ब फेकल्याचं कळताच थिएटरमध्ये एकच खळबळ उडाली. प्रेक्षकही जीवमुठीत घेऊन थिएटरबाहेर पळाले. ही घटना घडल्याचं कळताच पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली