मुंबई : नायर हॉस्पिटलमधील एमआरआयच्या मशिनमध्ये खेचल्या गेल्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने वॉर्डबॉयला निलंबित केले असून राज्यसरकारने मृताच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत जाहीर केली आहे.
राजेश मारू असं या तरुणाचं नाव आहे. तो त्याच्या बहिणीच्या सासूला बघायला नायरमध्ये आला होता. रुग्णालयातील कर्मचाऱ्याने त्याला एमआरआय रूममध्ये ऑक्सिजनचा सिलेंडर आणायचा असल्याच सांगितलं. नातेवाईकानं विरोध केला. एमआरआय रूममध्ये धातूची वस्तू नेण्यास मज्जाव असतानाही एमआरआय मशिन बंद असल्यानं सिलेंडर आत नेण्यास हरकत नसल्याच वॉर्डबॉयने सांगितल.
त्यामुळे राजेश सिलेंडर आत घेऊन गेला. मात्र आतमध्ये मशिन सुरूच होत्या. आत जाताच सिलेंडर सकट तो एमआरआय मशिनमध्ये ओढला गेला आणि सिलेंडरचा व्हॉल्व लीक होऊन ऑक्सिजन बाहेर येऊ लागला. राजेशचा हात एमआरआय मशिनमध्ये अडकला. अचानक हा प्रकार घडल्याने कोणालाच काही करता आलं नाही. अखेर वॉर्ड बॉयच्या मदतीने मशिन बंद करून राजेशला बाहेर काढण्यात आल आणि ट्रॉमा सेंटरमध्ये हलविण्यात आलं. मात्र उपचारा दरम्यान राजेशचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे मृताचे नातेवाईक संतापले असून दोषींवर जोवर कारवाई होत नाही तोवर राजेशचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याच राजेशच्या नातेवाईकांनी सांगितलयं. त्यामुळे नायरमध्ये तणावाची स्थिती आहे. याप्रकरणी नायरचे अधिष्ठाता डॉ. भारमल यांना फोन केला असता त्यांनी फोन उचलला. मात्र त्यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here