पुलगांव ट्रान्सफार्मरमधून तेल गळत असल्याने रात्रीचे दरम्यान भीषण आग, आगीत दोन दुकानांची राख रांगोळी.
पुलगांव ट्रान्सफार्मरमधून तेल गळत असल्याने रात्रीचे दरम्यान भीषण आग लागली. याभीषण आगीत जवळ असलेल्या दोन दुकानांची राख रांगोळी झाली. ही घटना 26 जानेवारी रोजी रात्रीचे दरम्यान घडली.
पुलगांव:- शहरातील कॉटन मील परिसरात वीज महावितरण कंपनीची डीपी आहे. यातुन अनेक दिवसांपासून तेळ गळत होते. याची अनेकदा नागरिकांनी वीज महावितरण कंपनीकडे तक्रार करण्यात आली. परंतु, वीज महावितरण कंपनीने याकडे दुर्लक्ष केले. यामुळे 26 जानेवारी रोजी रात्रीचे दरम्यान आग लागली. यामुळे अन्यत्र आगीचे लोळ सर्वत्र पसरल्याने शेख रोशन यांचे गादीचे तर विजय पवार यांचे इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला आगीने कवेत घेतले. यात दोनही दुकानांची जळुन राख रांगोळी झाली.
दोनही दुकानांला लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आग लागल्याची माहिती मिळताच नगर पालिकेच्या अग्निशामन विभागाची चमु घटनास्थळी पोहोचली. कर्मचारी निखिल आटे, कृणाल गणवीर, संदीप अजमिरे व स्थानिक नागरिक तुषार रामेश्वर वाघ यांच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात आली.