Meaningful relationship between Pimpri Chinchwad Municipal Corporation officials and contractors, allegations of major financial scams during BJP's tenure.
Meaningful relationship between Pimpri Chinchwad Municipal Corporation officials and contractors, allegations of major financial scams during BJP's tenure.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अधिकारी आणि ठेकेदारांचे अर्थपूर्ण संबंध, भाजपच्या कार्यकाळात  मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा आरोप.

पुणे :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील एफडीआर घोटाळ्याप्रकरणी महापालिकेची फसवणूक केल्याबद्दल पाच ठेकेदार कंपनीच्या मालकांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महापालिकेत भाजप सत्तेत आल्यानंतर हा पहिला मोठा आर्थिक घोटाळ्याचा आरोप आहे. त्यामुळे महापालिका तसंच अधिकारी वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

महापालिकेची विकास कामे घेतल्यास संबंधित ठेकेदार कंपनीकडून बँकेमध्ये अनामत रक्कम ठेवल्याची पावती द्यावी लागते. मात्र या पाच ठेकेदार कंपनीकडून बँकेने दिलेली एफडीआरच बोगस असल्याचे आढळून आले आहे. ही सरळ सरळ महापालिकेची फसवणूक आहे. पाच ठेकेदार कंपनीच्या मालकावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये मोठी नावे समोर येत आहेत. यामध्ये में. पाटील असोसिएटचे सुजित पाटील, कृती कन्स्ट्रक्शनचे विशाल कुऱ्हाडे, एस.बी.सवईचे संजय सवई, वैदेही कन्स्ट्रक्शनचे दयानंद मळगे, डी.डी.कन्स्ट्रक्शनचे दिनेश नवाणी या पाच कंपनीच्या मालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नेमका प्रकार काय…?

महापालिकेची विकास कामे घेतल्यास संबंधित ठेकेदार कंपनीकडून बँकेमध्ये अनामत रक्कम ठेवल्याची पावती द्यावी लागते. मिळालेल्या कामाच्या विशिष्ट टक्के ती रक्कम असते. अशी कोट्यवधी रुपयांची कामे कंत्राटदारांना मिळत असतात. साहजिकच कंत्राटदारांना लाखो रुपयांची अनामत रक्कम भरायला लागते. मात्र 18 ठेकेदारांनी महापालिकेला बँकेची बोगस एफडीआर दिलेली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घोटाळ्यात ठेकेदारांना पालिका अधिकाऱ्यांनी विशेषत: बांधकाम विभागातून मोठी मदत मिळाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आहे.

पिंपरी महापालिकेचे आयुक्त श्रवण हर्डीकर यांच्या आदेशानुसार पालिकेच्या स्थापत्य विभागाने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थापत्य विभागाचे अधिकारी रमेशकुमार जोशी यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. दरम्यान या प्रकरणात अद्यापर्यंत कुणालाही अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here