कराटेपटू मास्टर आकाश किशोर शिंदे यांचा राज्यपाल मा.भगतसिंग कोश्यारी यांनी केला सत्कार

57
कराटेपटू मास्टर आकाश किशोर शिंदे यांचा राज्यपाल मा.भगतसिंग कोश्यारी यांनी केला सत्कार

मीडिया वार्ता न्युज
२८ जानेवारी २०२२:  खेळ विभागातून मुंबई मधील गरीब गरजू व खेळाची आवड असलेल्या हजारो मुला-मुलींना 15 वर्षा पासून रॉयल स्पोर्ट्स अँड मार्शल आर्टस अकेडमी इंडिया या संथेच्या माध्यमातून मोफत कराटे प्रक्षिशन देवून उच्च स्तरावर त्यांना मार्ग दर्शन देणारे व मेजर ध्यानचंद केंद्रीय खेळ पुरस्कार -2021 , भारतीय खेळ पुरस्कार – नवी दिल्ली 2019 , भारत रत्न अटल गौरव पुरस्कार -2012 , महाराष्ट्र खेळ पुरस्कार सहभाग – 2022, अभिमान महाराष्ट्राचा जिवन गौरव महाराष्ट्र राज्य पुरस्कार 2022 ही नावाजलेल्या पुरस्काराणे सन्मानित कराटे पटू सुरक्षा अधिकारी ( सु. र. म) मास्टर आकाश किशोर शिंदे दिनांक 28 जानेवारी 2022 रोजी मा. श्री भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल – (राजभवन) येथे राज्यपाल यांचा शुभ हस्ते शाल देवून पुढील वाटचाली करिता शुभेच्छा देत सन्मानित करण्यात आले.

तसेच कराटे विषय माहिती क्लासेस बाबत माहिती मुलांची संख्या व त्यांना कशा प्रकारे प्रशिक्षण देता व मुलीना कोणत्या प्रकारे महिला संरक्षण याचे प्रशिक्षण देता ही संपूर्ण माहिती जाणून घेतली.

या शुभ कार्यक्रमात धारावी मधील  व्यापारी व शिवसेना गुजरात जिल्हा संपर्क प्रमूख श्री कमलेश वरिया व विश्व हिंदू परिषद चे विभाग सह मंत्री – मुंबई शहर राजीवकुमार चौबे हे ही राजभवन येथे उपस्थित होते व त्यांचा विश्व हिंदू परिषद कामाचा कार्यकाळ राज्यपाल यांनी जाणून घेत कामाबद्दल संपूर्ण माहिती घेतली व त्यांना शुभेच्छा दिल्या.