मुंबई पब्लिक स्कुलच्या धर्तीवर एक समान दर्जाचे व मोफत शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू कराव्या अशी भारतीय लोकसत्ताक संघटनेची शासनाला मागणी…

57

मुंबई पब्लिक स्कुलच्या धर्तीवर एक समान दर्जाचे व मोफत शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू कराव्या अशी भारतीय लोकसत्ताक संघटनेची शासनाला मागणी…

मुंबई पब्लिक स्कुलच्या धर्तीवर एक समान दर्जाचे व मोफत शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू कराव्या अशी भारतीय लोकसत्ताक संघटनेची शासनाला मागणी...

गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो.नं.९८६०८६०५३०

मुंबई : -बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अख्यातिरीतील असलेल्या शाळांच्या शैक्षणिक दर्जा खालावत चालला आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवरती होत असताना आपणांस दिसतो. भारतीय संविधानातून दर्जाची आणि संधीची समानता आपण स्वीकारली आहे. परंतु आज शिक्षण क्षेत्राचा विचार केला असता शिक्षणामध्ये ऐक समान दर्जा आपणांस दिसून येत नाही. सर्व नागरिकांना एक समान दर्जाचे शिक्षण देणे हे शासन प्रशासनाचे कर्तव्य आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात एकूण ११ शाळा ह्या मुबई पब्लिक स्कूलच्या शासनाने सुरु केल्या आहेत. मुबईतील लोकसंख्येचा विचार करता ११ शाळा पुरेशा नाहीत. काही मोजक्याच प्रभागामध्ये अशा शाळा चालू करणे हे ईतर प्रभागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणापासून दूर ठेवण्या सारखे आहे, हा त्या सर्व प्रभागातील विद्यार्थी, नागरिकांवरती एक प्रकारचा अन्याय आहे, भेदभाव आहे.
एकसमान दर्जाचे व मोफत शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा संविधानिक मुलभूत अधिकार आहे. तो त्यांना मिळावा या साठी प्रत्येक प्रभागात मुंबई पब्लिक स्कूलच्या धर्तीवर एक समान व दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू कराव्यात अशी मागणी भारतीय लोकसत्ताक संघटनेचे अध्यक्ष मा.अमोलकुमार बोधिराज सर यांनी शासनाला पत्रव्यवहार केल्याची माहिती देण्यात आली.