नागपूर विद्यापीठाच्या बी.ए ॲडिशनल अभ्यासक्रम सुरू ठेवा. ॲडिशनल अभ्यासक्रम बंद झाल्यास विद्यार्थ्यांचे होईल शैक्षणिक नुकसान. गौरव तिमांडे यांची मागणी.

57

नागपूर विद्यापीठाच्या बी.ए ॲडिशनल अभ्यासक्रम सुरू ठेवा.

ॲडिशनल अभ्यासक्रम बंद झाल्यास विद्यार्थ्यांचे होईल शैक्षणिक नुकसान.
गौरव तिमांडे यांची मागणी.

नागपूर विद्यापीठाच्या बी.ए ॲडिशनल अभ्यासक्रम सुरू ठेवा. ॲडिशनल अभ्यासक्रम बंद झाल्यास विद्यार्थ्यांचे होईल शैक्षणिक नुकसान. गौरव तिमांडे यांची मागणी.

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240

हिंगणघाट:- २८ जानेवारी २०२२
नागपूर विद्यापीठाच्या बी.ए ॲडिशनल अभ्यासक्रम जे बंद करण्यात आले ते अभ्यासक्रम सुरू ठेवण्याबाबत माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गौरव तिमांडे,युवराज माऊसकर,शुभम पिसे, संगेश ससाणे, हर्षल तपासे, फैजान सय्य, साहिल कडू,फाईम खान,आकाश कुंभलकर इत्यादींनी राज्यपाल भगतसिंग कोशारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री उदय सामंत, कुलगुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने बी.ए इंग्रजी वाडम:य,पॉलिटिकल सायन्स,संस्कृत,इतिहास,भूगोल, मानसिक शास्त्र इत्यादी विषयात बी.ए ॲडिशनल अभ्यासक्रमाची निवड करण्यात येते. त्यामुळे विद्यार्थी विद्यार्थिनी स्पेशल विषयात बी.ए ऍडिशनल च्या डिग्र्या घेऊन पास होतात आणि आपल्या सोयीनुसार नोकऱ्या करतात.
परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणातील तरतुदीचा अहवाल देत बी.ए ॲडिशनल हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक धोरणावर होणारा अन्याय आहे.
बी.ए च्या अभ्यासक्रमात दोन विषय हे अनिवार्य असतात तर तीन विषय निवडण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अन्य विषयाचे शिक्षण घ्यायचे असल्यास ते पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर बी.ए ॲडिशनल अभ्यासक्रमाची निवड करून संबंधित विषयाची परीक्षा देतात आणि बी.ए ॲडिशनलची डिग्री प्राप्त करतात.
परंतु नवीन शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी त्याच विषयातील पदवी आवश्यक नाही. त्यामुळे बी.ए ॲडिशनल हा अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णयाच्या प्रस्ताव विव्दत परिषदेसमोर मांडण्यात आला आहे तो रद्द करण्यात यावा.
तरी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हित लक्षात घेता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे ॲडिशनल हा अभ्यासक्रम सुरू ठेवावा अशी मागणी राज्यपाल भगतसिंग कोशारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री उदय सामंत, कुलगुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांना उपविभागीय अधिकारी मार्फत गौरव तिमांडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.