नागभि ड वार्ड क्रं 4 येथे 70 महिलांचा शिवसेनेत प्रवेश
*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*
नागभिड-आज दिनांक 26/1/2022 रोज शिवसेना महिला आघाडी तालुका आघाडी तर्फे हळदी कुंकू व पक्षप्रवेश कार्यक्रम आयोजित केला होता. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आद. पक्ष प्रमुख आमचे लाडके मुख्यमंत्री उधवसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मान. जिल्हा प्रमुख मुकेशभाऊ जिवतो डे यांच्या मार्गदर्शनात भोजराज भाऊ ज्ञान बोन वार शिवसेना तालुका प्रमुख . कीर्ती ताई गेडाम उप तालुका प्रमुख महिला आघाडी गायत्री ताई दडमल उप विभाग प्रमुख यांच्या नेतृत्वात 70 महिलांचा प्रवेश घेण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून भोजराज भाऊ ज्ञान बोनवार शिवसेना तालुका प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये नंदू खापर्डे उप शहर प्रमुख प्रमोद भाऊ राऊत उपविभाग प्रमुख अजित गोडे युवा सेना तालुका प्रमुख पत्रकार सुधाकरश्रीरामे, मुरली कोसरे ,रुपेश कडू ,बंशी कुंभरे होते. या कार्यक्रमास 80 महिला उपस्थित होत्या, त्यांना शिवसेना महिला आघाडी तर्फे वान व पक्ष प्रवेश करून घेतला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक कीर्ती ताई गेडाम उप तालुका प्रमुख यांनी केला तर सर्वाचे आभार गायत्रिताई दडमल उप विभाग प्रमुख यांनी केला .या सर्व महिला शिवसैनिकांचे शिवसेना परिवारात स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.