समाजसेवा करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना चांगले व्यासपीठ – सुदर्शन निमकर सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर द्वारा विसापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन समारंभ संपन्न

52

समाजसेवा करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना चांगले व्यासपीठ – सुदर्शन निमकर

सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर द्वारा विसापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन समारंभ संपन्न

समाजसेवा करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना चांगले व्यासपीठ - सुदर्शन निमकर सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर द्वारा विसापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन समारंभ संपन्न

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
8830857351

चंद्रपूर : 28 जानेवारी
विद्यार्थ्यांच्या प्रगती सोबतच त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व विद्यार्थी सामाजिक, आर्थिक, शारीरिक व मानसिकरीत्या सक्षम व्हावे तसेच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व राष्ट्रीय कार्याविषयी आवड निर्माण व्हावी, श्रमप्रतिष्ठा वाढीस लागावी आणि विद्यार्थी राष्ट्रप्रेम, आरोग्य जाणीव, जागृती, परिवहनाचे नियम, सायबर सुरक्षा, स्वच्छता, मतदान याविषयी जागरूकता निर्माण करतील हा उद्देश समोर ठेऊन गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित सर्वोदय शिक्षण मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी पर्यंत विसापूर ता. बल्लारपूर येथे ‘ग्रामविकासाकरीता युवाशक्ती’ या विषयावर महाविद्यालयीन विशेष शिबिर आयोजित केले आहे. अध्यक्षीय भाषणात माजी आमदार सुदर्शन निमकर म्हणाले की, सामाजिक कार्य करताना आपले पद, वय, शिक्षण याचे काहीही बंधन नसते. महाविद्यालयीन जीवनात समाजसेवा करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना हे एक चांगले व्यासपीठ आहे. युवकांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व घडविण्याचे कार्य शिक्षण क्षेत्राद्वारे होत असते. प्रभावी व्यक्तिमत्त्व घडवत असताना तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाण व सेवाभाव निर्माण करण्याचे कार्य महाविद्यालयीन स्तरावर राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाद्वारे होत आहे. तरुणांमध्ये समाजसेवेची जाण झाल्यानंतर त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे राष्ट्रसेवा होय. प्रास्ताविक उषा खंडाळे यांनी केले, राष्ट्रीय सेवा योजना हा भारत सरकारच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयाने निधी पूर्व पुरवलेला हा एक कार्यक्रम आहे, आणि ही एक स्वयंसेवी अशी संस्था आहे. भारत सरकारने 24 सप्टेंबर 1969 रोजी प्रथम 37 विद्यापीठांमध्ये ही योजना राबवली आणि त्याचं रूपांतर आता एका वटवृक्षाप्रमाणे झालेला आहे आणि आता अनेक विद्यापीठांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना राबवली जात आहे. प्रमुख अतिथी उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार म्हणाले की, मतदार जनजागृती संदर्भातला जो उपक्रम राबवण्यात आला आपण जिल्हाधिकाऱ्यांना आश्वासन दिलं होतं की जर गावातले काही मतदारांची नोंदणी व्हायची बाकी असेल त्यांचे अठरा वर्षे पूर्ण झाले असेल त्यांचे फॉरमॅट आम्ही आमच्याकडे फॉर्म भरून आम्ही निवडणूक अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा ह्या शिबिराच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत.
उद्घाटनीय भाषणात डॉ. प्रमोद काटकर म्हणाले की, आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच संधी येत असतात आणि त्या संधीचं सोनं कसं करायचं हे तुम्हालाच ठरवायचं असतं, कारण महाविद्यालयामध्ये चार भिंतीच्या आत शिक्षण घेत असताना गोंडवाना विद्यापीठांनी जो काही अभ्यासक्रम ठरवून दिला, त्यानुसार आपण अभ्यास करत असतो, परीक्षा देतो, पास होतो, मी बरेचदा असे म्हणतो की, परीक्षेमध्ये सुवर्णपदक मिळवणं किंवा परीक्षेमध्ये अव्वल येणं हे महत्त्वाचे आहे परंतु त्यानंतर आपलं चांगलं करिअर करण्याची आपल्यामध्ये असलेल्या नेतृत्वगुणांचा विकास करण्याची संधी महाविद्यालयाच्या वतीने वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही देत असतो. आणि राष्ट्रीय सेवा योजना हे असं व्यासपीठ आहे, ज्यामध्ये तुमच्यात असलेले सुप्त गुण, तुमच्यात असलेले मूलभूत कौशल्य, तुमच्या मध्ये असलेल्या नेतृत्वगुणांचा विकास करण्याची एक संधी या शिबिराच्या माध्यमातून तुमच्या समोर आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुदर्शन निमकर माजी आमदार तथा उपाध्यक्ष सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूर, उद्घाटक प्राचार्य डॉ.‌ प्रमोद काटकर, प्रमुख अतिथी उपसरपंच अनेकश्वर मेश्राम ग्रामपंचायत विसापूर, उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, रा. से. यो, जिल्हा समन्वयक डॉ.विजया गेडाम, रा. से. यो विभागीय समन्वयक डॉ. उषा खंडाळे, लोकमत प्रतिनिधी सुभाष भटवलकर, रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप गोंड, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ. वंदना खनके, डॉ. निखील देशमुख, उपस्थित होते. कार्यक्रमात उपसरपंच अनेकश्वर मेश्राम ग्रामपंचायत विसापूर, रा. से. यो, जिल्हा समन्वयक डॉ. विजया गेडाम यांनी आपले मनोगत व्यक्त केले ‌ कार्यक्रम संचालन डॉ. कुलदीप गोंड तर आभार डॉ. निखील देशमुख यांनी मानले. स्वयंसेवक व स्वयंसेविका आदींची उपस्थीती होते.