प्रजासत्ताकदिनी माणगांव नगरपंचायत, पोलीस परेड मैदानात शामियाने सजले प्रचंड उत्साहवर्धक वातावरण

46

प्रजासत्ताकदिनी माणगांव नगरपंचायत, पोलीस परेड मैदानात शामियाने सजले प्रचंड उत्साहवर्धक वातावरण

प्रजासत्ताकदिनी माणगांव नगरपंचायत, पोलीस परेड मैदानात शामियाने सजले प्रचंड उत्साहवर्धक वातावरण

✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞

माणगांव मध्ये पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनी जोरदार तयारी प्रशासनाने विशेषतहा माणगांवचे प्रांत उमेश बिरारी व तहसिलदार प्रियंका आयरे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात ध्वजारोहणाची जय्यत तयारी करण्यात आली होती. प्रशासकिय अधिकारी कर्मचारी यांनी जातीने लक्ष घालीत जुने तहसिल जवळील पोलीस परेड मैदानात संपूर्ण डांबरीकरण करुन व मैदानाच्या सभोवताली शुभ्र पांढऱ्या पडद्यांनी व लाल गालिचे अंथरुन मैदानात शामियाना सजावट केली. पहिल्यांदाच इतकी जय्यत चोख व्यवस्था माणगांवकरांनी अनुभवली आहे. बरोबर ०९.१५ वाजता ध्वजारोहनाचा शानदार समारंभ संपन्न झाला आहे.
पोलीस व होमगार्डचे पथसंचलनात मान्यवर प्रांत यांना मानवंदना देण्यात आली. पोलीस कवायतीचे पथसंचलन कमान महिला पोलिस उप निरिक्षक अस्मिता पाटील यांनी चोख सांभाळली. देशप्रेम आणि डोळ्याचे पारणे फेडणारा हा कार्यक्रम शालेय विद्यार्थी आणि उपस्थित आबालवृध्द महिला पुरुषांमध्ये नवचैतन्य उर्जादायी असल्याचे अनुभवास आले. नगर पंचायतीचीही ध्वजारोहन तयारी अशाच धर्तीवर करण्यात आली. सुंदर रांगोळी, फुलांची सजावट व दरवळणाऱ्या अगरबत्तीचा सुगंध चैतन्यमयी भारावलेले वातावरणात नतमस्तक होत जोशपूर्ण राष्ट्रगाण करीत आपल्या देशाची आन बाण शान भारतिय तिरंग्याला माणगांवकरांनी कडक सलामी देत ध्वजवंदन संपन्न झाले.
याप्रसंगी मुख्य शासकिय ध्वजारोहणाचे औचित्याने माणगांव मधिल सर्व शालेय विद्यार्थ्यांनी पोलीस मैदानात आपल्या कलागुणांचा वर्षाव करीत समयोचित रंगतदार कार्यक्रमांचे सादरीकरण करुन माणगांवकरांची मने जिंकली. जवळपास तिन तास चाललेल्या शालेय कार्यक्रमांना उपस्थित प्रांत उमेश बिरारी, तहसिलदार प्रियंका आयरे, मुख्याधिकारी संतोष माळी तसेच माणगांव मधिल सर्व नगरसेवक, सभापती नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार तसेच प्रतिष्ठीत नागरिक लोकप्रतिनीधी यांच्या लक्षणिय उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांना दाद देत सुबक सुंदर स्मृतीचिन्ह व रोख रक्कम बक्षिस देऊन गौरविण्यात आले आहे.
पहिल्यांदाच २६ जानेवारी प्रजासत्ताकदिन जोशपूर्णतेने संपन्न झाल्याच्या प्रतिक्रिया सर्वांच्या तोंडुन आपसुक उमटल्या आहेत.