नेरळ चालू स्कॉर्पिओ गाडीला अचानक आग; मात्र जीवित हानी नाही

55
नेरळ चालू स्कॉर्पिओ गाडीला अचानक आग; मात्र जीवित हानी नाही

नेरळ चालू स्कॉर्पिओ गाडीला अचानक आग; मात्र जीवित हानी नाही

नेरळ चालू स्कॉर्पिओ गाडीला अचानक आग; मात्र जीवित हानी नाही

✒️संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333✒️📞

नेरळ;-दि.२५ रोजी रात्री साधारण ८ च्या सुमारास कल्याण कर्जत रस्त्यावर नेरळ गावाच्या बाहेर एका स्कॉर्पिओ गाडीला अचानक आग लागली आणि या आगीमध्ये गाडी संपूर्ण जळली आहे. स्थानिक पोलीस व ट्रँकर मदतीसाठी पुढे आल्याने गाडीचे नुकसान वाचविण्याचे प्रयत्न केले गेले.मात्र आग इतकी भडकली की शेवटी गाडीसंपुर्ण जाळली .
बदलापूर येथून कर्जत कड़े दोन प्रवासी यांना घेऊन एम एच ०२ ए व्ही ४६६७ हि स्कॉर्पिओ गाडी कल्याण कर्जत रस्त्याने जात होती. हुतात्मा चौक चे पुढे कर्जत कडे जात असताना तुळशी पार्क येथे या गाडीच्या बोनट मधून धूर यायला लागला. त्यामुळे चालकाने प्रसंगावधान राखून गाडी थांबवून गाडीमधील तिन्ही प्रवाशांना खाली उतरवायला उतरले .मात्र धूर येत असलेली गाडी पुढे पुढे जात अचानक पेटली. त्या गाडीमधून आगीचे लोट बाहेर आल्याने नेरळ पोलिसांनी कल्याण कडून येणारी वाहने आणि माथेरान कडून येणारी वाहने हुतात्मा चौक येथे थांबवून ठेवली. तर कर्जत कडून येणारी वाहने एल ए ई एस शाळेच्या अलीकडे थांबवण्यात आली होती. ट्रॅफिक पोलीस पी.एस.आय. नांदगावकर, सरगर व टीम ने प्रसंगावधान राखून चार फायर एस्टिंगेशर आणणे परंतु त्यांनी देखील आज नियंत्रणात आली नाही नंतर नेरळ गावातील पाणी टॅँकर मागवून घेतले. रात्रीच्या वेळी चालक उपलब्ध नसल्याने ट्रँकर मालक महेंद्र म्हसकर यांनी स्वतः पेटत्या गाडी जवळ जाऊन गाडीला लागलेली आग विझविली.
आग विझवून झाल्यावर कर्जत येथून अग्निशमन बंब पोहचला होता तो पर्यंत गाडीचे १०० टक्के नुकसान झाले होते पण जीवित हानी झाली नाही शेवटी गाडी रस्त्याच्या बाजूला काढून ठेवण्यात आली.

एकंदरीत पाहता नेरळ येथे अग्निशमन दलाची गाडी असणे अत्यंत गरजेचे आहे व त्याकरिता नगरपंचायत होणे आवश्यक आहे अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.