भूमिपुत्र संघटनेच्या धडक मोर्चाला शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे समर्थन
🖋️ साहिल सैय्यद…..
📲 9307948197
घुग्घुस :- येथील शिवसेना (उबाठा) व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) ने घुग्घुस शहर व ग्रामीण भागातील भूमिपुत्र, शेतकरी व बेरोजगारांच्या विविध मागण्यासाठी भूमिपुत्र संघटनेतर्फे २९ जानेवारी रोजी लॉयड्स मेटल्स कंपनीविरोधात काढण्यात येणाऱ्या धडक मोर्चाला आपले समर्थन जाहीर केले आहे जाहीर समर्थनाचे पत्र देण्यात आले आहे.
घुग्घुस हे शहर महाराष्ट्रातील एक प्रमुख औद्योगिक शहर आहे. घुग्घुस शहर व ग्रामीण भागातील लोकसंख्या हि जवळपास १ लाख आहे. घुग्घुस शहराच्या मध्यभागी असलेल्या लॉयड्स मेटल्स कंपनी मुळे अनेक वर्षा पासून शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक समस्यांशी झुंज द्यावी लागत आहे याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या कंपनीचे विस्तारिकरण यावर्षी करण्यात आले आहे. त्यामुळे शहर व ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्यात वाढ होईल याला नाकारता येत नाही.
घुग्घुस शहर व ग्रामीण भागातील स्थानिक सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींना शिक्षणानुसार कंपनीत नौकरीत समावून घ्यावे, कंपनीच्या प्रदूषणा मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, कंपनीच्या प्रदूषणामुळे नागरिकांना विविध आजार होत आहे त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने चौकशी करून कंपनी वर कारवाई करावी, घुग्घुस ते पांढरकवडा आणि घुग्घुस ते सोनेगाव पांदन रस्त्यावर केलेले अतिक्रमण हटविण्यात यावे, सन २०१३ पासून ते आतापर्यंत सीएसआर फंडातून केलेल्या खर्चाची चौकशी करण्यात यावी अशा अनेक विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले तसेच सकारात्मक चर्चा न झाल्यास २९ जानेवारी रोजी कंपनीवर धडक मोर्चा काढण्याचा इशारा चंद्रपूरचे संयोजक भूमिपुत्र युवा संघटना दिनेश चोखारे यांनी निवेदनातून दिला आहे.
यावेळी पवन आगदारी मा. जिल्हाध्यक्ष चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग, शिवसेना शहरप्रमुख बंटी घोरपडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिलीप पिट्टलवार, शिवसेना नेते बाळु चिकनकर, हेमंत उरकुडे काँग्रेस नेते, शरद कुमार, सतीश देवतळे, काँग्रेस नेते शेखर तंगलापेल्ली, सुधाकर बांदूरकर, लक्ष्मण बोबडे, चेतन बोबडे, वेदप्रकाश मेहता, रघुनाथ धोंगडे, सत्यनारायण डकरे, उपस्थित होते.