महिलांनी अन्याय सहन करुन घेऊ नका. स्री शक्ति कायदा आहे शासन स्रीयांसाठी सक्षम आहे.. पोलीस उपनिरीक्षक योगिता बांडे.

54

✍️संतोष उध्दरकर. ✍️

म्हसळा शहर प्रतिनिधी

📞७८७५८७१७७१📞

म्हसळा :- श्री रविप्रभा मित्र संस्था रायगड महिला सदस्य यांच्या माध्यमातून हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता या समारंभात प्रमुख पाहुणे म्हसळा पोलीस उपनिरीक्षक योगिता बांडे मॅडम या उपस्थित होत्या. सर्वप्रथम जेष्ठ महिला सदस्य कल्याणी लाड यांनी योगिता मॅडम यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या वेळी उपस्थित सर्व महिलांना मार्गदर्शन करताना पोलीस उपनिरीक्षक योगिता बांडे मॅडम यांनी सांगितले की महिला सर्व क्षेत्रात सक्षम आहेत, महिलांनी ठरविले तर खूप काही करू शकतात, ग्रामीण भागातील महिला यांना सांगणे आहे की आपल्या मुलांना योग्य शिक्षण व संस्कार दिले पाहिजे, शिक्षण नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. महिलांवर अत्याचार होतात, शिक्षित असुन देखील फसवणूक केली जाते, सायबर गुन्हे होत आहेत, यापासून महिलांनी सावध राहणे आवश्यक आहे. महिलांनी अन्याय सहन करुन घेऊ नका यासाठी स्री शक्ति कायदा लागू आहे, शासन स्रीयांसाठी सक्षम आहे. विद्यार्थ्यांना देखील सांगणे आहे की स्पर्धा परीक्षा देणे, योग्य शिक्षण घेणे यासाठी प्रयत्नशील असल्याने उद्याचे अधिकार बनाल. या कार्यक्रमात काही महिला सदस्य यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाच्या शेवटी पोलीस उपनिरीक्षक योगिता बांडे मॅडम यांचे महिलांनी औक्षण करून हळदीकुंकूवाचा वाण देऊन तिळगुळ देण्यात आले व शुभेच्छा दिल्या, सर्व महिलांनी एकमेकींना तिळगुळ देऊन शुभेच्छा दिल्या.अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हा हळदीकुंकूवाचा समारंभ संपन्न झाला. या वेळी उपस्थित श्री रविप्रभा मित्र संस्था महिला सदस्य कल्याणी लाड,स्वराली लाड, समिक्षा लाड,निधी रिकामे,सानिका उध्दरकर,अक्षता बिरवाडकर,रंजना काते,व सर्व महिला सदस्य उपस्थित होत्या.