सहा महिने होऊन सुद्धा, रस्त्याचे काम काय होईना, कधी राहदारी साठी होईल खुला नागरिकांना पडलाय प्रश्न.

67

सहा महिने होऊन सुद्धा, रस्त्याचे काम काय होईना, कधी राहदारी साठी होईल खुला नागरिकांना पडलाय प्रश्न.

सहा महिने होऊन सुद्धा, रस्त्याचे काम काय होईना, कधी राहदारी साठी होईल खुला नागरिकांना पडलाय प्रश्न.

✍️ पप्पू वि. नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी
📞 7304654862 📞

मुंबई :- गोरेगांव पश्चिम प्रेम नगर मधील होंडा वर्कशॉप बाहेरील पुलाच्या कामानिमित्त मुख्य रस्त्याचे गेले 6-7 महिन्या पूर्वी खोदण्यात आले होते, एवढे महिने होऊनसुद्धा रस्ता अजूनही राहादारीसाठी बंद आहे.

एवढे महिने होऊनसुद्धा कामाला वेळ का लागतोय आश्चर्य करण्यासारखी गोष्ट सर्वसामान्य नागरिकांच्या मनात येऊ लागली आहे. तिथला कंत्राटदार कोण आहे व त्याला कामाची वेळ मर्यादा पालिकेने दिली होती का, काहीच समजण्याच्या पलीकडे आहे.

पालिका प्रशासन एवढी सुस्त कशी असू शकते, का एवढा कामाला उशीर होतोय, याच उत्तर पालिका प्रशासनाने तिथल्या जनतेला दिल पाहिजे. तो प्रेम नगरचा मुख्य रस्ता आहे. तिथून मालाड पश्चिम, वर्साली हिल रोड, मुलुंड लिंक रोड, मालाड लिंक रोड, या इत्यादी रोड ला कनेक्ट होणारा एकमेव रस्ता आहे. तिथून हजारो रहिवासी मोलमजुरी साठी ये -जा करत असतात.

पण रस्ताच 6-7 महिने बंद असल्या मुळे नागरिकांना रोड नंबर 2, व पूर्ण एस व्ही रोड ला वळसा मारून जावं लागत. या उलटच्या प्रवासामध्ये नागरिकांचा अर्धा तास वाया जाताना दिसून येतो. व रिक्षा प्रवाशांना पण जास्त भाडे द्यावे लागते.

पालिकेने मुंबईत कामांचा जणू सपाटाच लावलाय, जाऊ तिथे रस्त्याची कामे, गटार नाले सुधारणा त्यामध्ये नियोजनअभावी वाहतूक कोंडी. पुरतं मुंबईकर मेटाकुटीस आलेला पाहायला मिळतो.त्याला कामावर जेवढा त्रास नसेल होत तेवढा त्रास यायला जायला होतो. मुंबई चा विकास झाला पाहिजे त्यात तीळ मात्र शंखा नाही. पण सर्व सामान्य जनतेला वेठीस धरून व त्यांचे हाल होणार असतील तर ते कोणालाही मान्य नाही.

विकासाच्या आड जनता कधीही येणार नाही. परंतु तेवढी जवाबदारी पालिका प्रशासन व राज्य सरकार ने स्वीकारली पाहिजे. महापलिका ठेकेदारांना कामांची कॉन्टॅक्ट देते, पण त्यात कामाचा दर्जा, कामाचे कालावधी, याचा फलक कामाच्या ठिकाणी लावणं बंधनकारक केले पाहिजे, आणि ठेकेदार त्या कामांचा नियोजन व वाहतुकीवर होणारा परिणाम लक्षात घेता ठोस नियोजन करणं ठेकेदाराची च जवाबदारी आहे.

असे प्रत्येक ठेकेदारांनी नियोजन बद्ध काम केल्यास वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होतील. व ज्या -ज्या ठिकाणची कामे लवकर पूर्ण होतील असे जनतेला वाटते, सदर गोरगांव प्रेम नगरच्या रस्त्याचे काम का राखडलंय ते महापालिकेने लवकरात लवकर संबंधित ठेकेदाराशी बोलून त्याचा मार्ग काढून लवकर वाहतुकीस खुला करावा. अशी रहिवाशांची मागणी आहे.