लोटस पब्लिक स्कूल मध्ये ‘प्रजासत्ताक दिन’
मनोज एल खोब्रागडे
✍🏻सह संपादक✍🏻
मो 8208166961
भंडारा :- लोटस पब्लिक स्कूल, वैशाली नगर, भंडारा येथे ‘प्रजासत्ताक दिन’ उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देशाच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनी श्री देवेन्द्र बडोले यांच्या हस्ते सौ. अश्विनी भैसारे व डॉ. महेशकुमार भैसारे यांच्या उपस्थितीत झेंडा वंदन पार पडला. तिरंगी ध्वजाला सलामी देवून राष्ट्रगीताचे गायन करून राष्ट्र्ध्वजाला वंदन करण्यात आले. सदर उपक्रमशील शाळा नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना अनुभावातून शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत असते. आजच्या दिवशी मुलांच्या मनात देशभक्तीची भावना रुजावी म्हणून लहान मुलांनी विविध देशभक्ती पर गीतांवर नृत्य सादर केले. नन्ना मुन्ना राही हू, हम इंडिया वाले, देश रंगीला इ. गीतांमधून देशप्रेम जागृत करून प्रेक्षकांची मने जिंकली. प्ले ग्रुप मधून युगम शहारे, नित्या नागोलकर, भव्या मानकर, ताश्वी भिवगडे, गर्वित ठाकरे, अभिर मते तर नर्सरी मधून सावी पंचभाई, कुणाल चावके, नमन सोनवाने, शार्विल चव्हाण, ध्रीती मेश्राम, कियारा धमगाये, शरण्या वंजारी, एलकेजी मधून दिशांशी आगाशे, यशवी खोब्रागडे, अदविका खोब्रागडे, भाविन सार्वे, उमंग पचारे, रिधान धुळसे, शार्दुल शहारे, एकांश दमाहे आणि यूकेजी मधून मेघना मिराशे, आशु श्रावणकर, अनुज उरकुडे यांनी सहभाग घेतला. तसेच अनुज उरकुडे, उमंग पचारे, रिधान धुळसे, दिशांशी आगाशे, यशवी खोब्रागडे या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनावर भाषण सादर केले. यावेळी मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता. अशा रीतीने प्रजासत्ताक दिना चा राष्ट्रीय उत्सव साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अश्विनी भैसारे मॅडम, संगीता पुरी मिस, छाया संग्रामे मिस, रुचिता आगरे मिस, नंदिनी खोब्रागडे मिस, रेखा दीदी यांनी अथक परिश्रम घेतले.