आदिवासी विविध सहकारी संस्थेत नियमानुसारच शिपाई पदभरती

68

आदिवासी विविध सहकारी संस्थेत नियमानुसारच शिपाई पदभरती

आदिवासी विविध सहकारी संस्थेत नियमानुसारच शिपाई पदभरती

संचालक मंडळाचा पत्रकार परिषदेत खुलासा
जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही प्रतिनिधी
मो 880689909

सिंदेवाही :- आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित लाडबोरी या संस्थेतील शिपाई पद रिक्त झाले असल्याने संस्थेला कार्यालयीन काम करताना अडचणी निर्माण होत होती. त्यामुळे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सिंदेवाही या कार्यालयाकडून शिपाई पद भरण्याची मंजुरी घेऊन व सदर कार्यालयाने दिलेल्या अटी शर्थीच्या अधीन राहून नियमानुसारच शिपाई पदाची भरती केली असल्याचा खुलासा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाने पत्रकार परिषदेतून केला आहे.
आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित लाडबोरी या संस्थेने नुकतीच शिपाई पदाची भरती केली असून त्यामध्ये शुभम राजेश नन्नावरे यांची गुणतालिके नुसार निवड झाली आहे. मात्र गावातीलच सामाजिक कार्यकर्ते कमलाकर कामडी यांनी सदर पद भरती मध्ये गैर प्रकार झाला असून संस्थेचे अध्यक्ष गैरहजर असताना , त्यांच्याच मुलाची निवड केली असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला होता . त्याबाबत खुलासा करताना संस्थेचे संचालक मंडळ यांनी सदर पदभरती करण्यासाठी वर्तमान पत्रांमधून जाहिरात देऊन शिपाई पदासाठी उमेदवारी अर्ज मागविण्यात आले. यामध्ये फक्त पाच अर्ज आले होते.
संस्थेच्या नियमानुसार कमीतकमी १० पेक्षा जास्त उमेदवारी अर्ज आल्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात येते. मात्र पाच अर्ज आले असल्याने केवळ तोंडी परीक्षा घेऊनच गुण तालिका घेण्यात आली. व त्यावरूनच निवड करण्यात आली.

जाहिराती मध्ये प्रकाशित केल्या प्रमाणे ३ जानेवारी रोजी प्रत्यक्ष मुलाखत घेऊन निवड करायचे होते. मात्र ३ जानेवारी रोजी संस्थेचे अध्यक्ष यांची तब्बेत बरी नसल्याचा अर्ज संस्थेला देण्यात आला होता. त्यामुळे संचालक मंडळाने सभाध्यक्षांची निवड करून सभा घेतली होती.
नोटीस बोर्डवर नोटीस लावलेला होता.
संस्थेच्या संचालक मंडळाने कोणत्याही प्रकरचा घोळ न करता निपक्षपती पणाने शिपाई पदाची निवड केली असून पद भरतीमध्ये कोणताच घोळ झाला नसल्याचा खुलासा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित लाडबोरी येथील संचालक मंडळाने पत्रकार परिषदेतून केला आहे.