चेन्नई: कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं आज निधन झालं. ते ८२ वर्षाचे होते. कांची कामकोटी पीठाचे ते ६९ वे शंकराचार्य होते.
शंकराचार्य जयेंद्र सरस्वती गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. वाढत्या वयामुळे त्यांचं शरीर उपचाराला साथ देत नव्हतं. गेल्या महिन्यात त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने तात्काळ चेन्नईतील श्री रामचंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना कमी रक्तदाबाचाही त्रास होता. आज प्रकृती आणखीनच खालावल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.