मद्यपीने केली मराठी अभिनेत्रीचा शिवीगाळ करत विनयभंग. 

48

मद्यपीने केली मराठी अभिनेत्रीचा शिवीगाळ करत विनयभंग. 

A Marathi actress was abused by an alcoholic.
A Marathi actress was abused by an alcoholic.

संदीप साळवी, प्रतिनिधी

गोरेगाव:- परिसरातील जैन रुग्णालयाजवळ एका मराठी अभिनेत्रीला शिवीगाळ करत तिच्यावर हल्ला केल्याच्या आरोपाखाली गोरेगाव पोलिसांनी एका 38 वर्षीय व्यक्तीस अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मद्यपान केलेल्या अवस्थेत होता. जेव्हा त्याने रुग्णालयाजवळ तिचा मार्ग अडविला आणि तेव्हा तिच्याशी त्याचा वाद सुरु झाला. त्याने तिला शिवीगाळ केली आणि तिला ढकलले. शुक्रवारी ही घटना घडली. गोरेगाव पोलिसांकडून भादंवि कलम 354, 509, 323, 506 आणि 185 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.