नांदेडमध्ये अनाथाश्रम चालकाकडूनच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार.
✒नांदेड जिल्हा प्रतीनिधी✒
नांदेड,दि. 28 फेब्रुवारी:- आज देशात आणी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर महिला आणी मुलीवर अत्याचार आणी बलात्कारच्या घटना घडत असल्याचे समोर येत आहे. आता नांदेड जिल्हातील अनाथ आश्रमातील एका अल्पवयीन मुलीवर संस्थाचालकानेच लैंगिक अत्याचार केल्याच्या खळबळजनक घटनेने संपुर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणात संस्थाचालक शिवाजी गुट्टे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार नांदेडमधील मुदखेड येथे एक अनाथाश्रम आहे. या अनाथाश्रमात अनेक मुली वास्तव्यास आहेत. आश्रमाचा संस्थाचालक शिवाजी गुटठे याने तक्रारदार मुलीवर लैंगिक अत्याचार केले. तसा आरोप तक्रारदार मुलीने केला आहे. तक्रारदार मुलीने आरोपीच्या अत्याचारांना कंटाळून अखेर आपल्या एका मैत्रीणीसोबत अनाथाश्रमातून शुक्रवारी रात्री 14 आणि 16 वर्षीय दोन मुलींनी पलायन केले होते. यानंतर अनाथाश्रमामधून मुली गायब असल्यामुळे खळबळ उडाली. रेल्वेने या दोन्ही मुली शनिवारी पहाटे किनवट रेल्वे स्टेशन येथे पोहचल्या होत्या. रेल्वे स्टेशन परिसरात भटकत असताना रेल्वे पोलिसांना संशय आला. त्यांनी या दोन्ही मुलींना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आश्रमात मारहाण होत असल्याने पळल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वे पोलिसांनी लगेच ही माहिती मुदखेड पोलिसांनी दिली.
पोलिसांचा समय सुचकतेमुळे हा प्रकार उघडकीस.
मुली अनाथाश्रमातून गायब झाल्यानंतर त्या किनवट येथे भटकत होत्या. या दोन मुलींच्या हावभावावरुन त्या अडचणीत असल्याचे किनवटच्या पोलिसांना लक्षात आले. पोलिसांनी या मुलींची चौकशी केल्यानंतर मुलींनी त्यांच्यासोबत घडलेला हा धक्कादायक प्रकार पोलिसांना सांगितला. अनाथाश्रमाचा चालकच यातील एका मुलीवर लैंगिक अत्याचार करत असल्याचे या मुलींनी सांगितले.