अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडुन आरोपीस केली अटक.
इंदोरा वाहतूक पोलीस शाखेची कारवाई

✒मनोज खोब्रागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी✒
चंद्रपूर (नागपूर):- इंदोरा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री. मनीष बनसोड व पोलीस शिपाई राहुल लोखंडे यांनी बुधवारी अवैधरित्या रेती वाहतूक करताना बोलोरो पिकप वाहन क्रमांक – MH40 BL 8834 सकाळी 06:30 वाजे दरम्यान खसाळा मसाळा गाव, कामठी रोड येथे पकडला. यावेळी वाहनातील चालक पळुन गेला मात्र वाहन मालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले.
सखोल चौकशी केली असता त्यांनी माहिती दिली की सदर ची रेती बिना घाट येथून विना परवाना अवैधरित्या आणली आहे. त्या वरून वाहनाला व वाहन मालकाला पोलीस स्टेशन कपील नगर च्या ताब्यात पुढील कायदेशीर कारवाई करीता ताब्यात देण्यात आले आहे.