वर्धा शहरातील गोल बाजार परिसरात भीषण आग.
15 ते 20 दुकाने जळून खाक.
भाजी व्यापाराचे लाखो रुपयांचे नुसकान.

✒️ प्रशांत जगताप ✒️
वर्धा :- शहरातील प्रसिद्ध गोल बाजार परिसरात आज भीषण आग लागलीय. आगीत जवळपास 15 ते 20 भाजी विक्रेत्यांची दुकाने जळून पुर्णत खाक झाली आहेत. सध्या घटनास्थळी वर्धा अग्निशामक दलाकडून आग विजविण्याचा आटोकाट प्रयत्न सुरु आहे.
वर्धा शहराच्या मध्यभागात असलेली गोल बाजार मुख्य बाजारपेठेत आग लागल्याने वर्धा शहरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आगीत अनेक व्यापाराची भाजीपाला, फ्रुट, विक्रीचे साहित्य आणि दुकाने जळून खाक झाली आहेत. काही वेळेतच आगीने रौद्ररूप धारण केलं. यावेळी परिसरात नागरिकांची एकच गर्दी झाली होती.
आगीत भाजी व्यापाऱ्यांचं लाखोचे नुकसान झालंय. आगीत हातगाड्यांच्या बंडी देखील जळून खाक झाल्या आहेत. गोल बाजार परिसरात घटनास्थळी वर्धा पोलिसांसह, अग्निशामक दल दाखल झालं आहे. आणी आगीवर नियंत्रण मीळवण सुरु आहे. आग कशाने लागली याच कारण अजुन पर्यंत समोर आल नाही.