विद्यार्थाच्या अन्न, धान्यावर डाका, उस्मानाबादमधिल धक्कादायक घटना.
विद्यार्थाच्या मुखात जाणारे हे अन्न माणुस रुपी गिधाडे भष्ट्राचार करुन खाऊ लागले आहेत.

✒उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी✒
उस्मानाबाद, 28 फेब्रुवारी :- जिल्हातील शाळेत विद्यार्थाना मीळणा-या अन्न, धान्य आहारावर भष्ट्राचारी अधीकारी आणी पुरवठेदार यांचा द्वारा डाका टाकला जात असल्याचे समोर येत आहे.
आज शालेय विद्यार्थी शारीरिक दृष्ट्या सक्षम व्हावा या साठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत केंद्र सरकारने शालेय पोषण आहार योजना सुरू केली. मात्र या योजनेत भ्रष्टाचाराचे मोठे रॅकेट उस्मानाबाद जिल्ह्यात उघडकीस आले आहे. मापात माप करुन हा सगळा घोळ घातला जात असल्याचे समोर आले आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी करत केंद्र सरकारने सर्व शिक्षा अभियानांतर्गत शालेय पोषण आहार योजना मोठा गाजावाजा करत सुरू केली. विद्यार्थ्यांच्या पटसंख्या नुसार त्यांना तांदुळ, दाळ व इतर पोषणाचे साहित्य देण्याचे सुरू केले. विद्यार्थ्यांची पटसंख्या नुसार किलो ग्रॅमनुसार अन्न धान्य दिले जाते. मात्र, या मापात पुरवठादार शिक्षक यंत्रणेला हाताशी धरुन मोठा घोळ घालत आहेत. 50 किलो च्या गोणीत 35 किलो धान्य देत. 15 किलोचे माप मारत आहे. हा सगळा घोटाळा चक्क शिक्षकांनी उघड पाडला आहे.
कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा येथील जिल्हापरिषद शाळेत पोषण आहार आला असता. याची मोजणी केली असता. तेथील मुख्याध्यापक बाळकृष्ण तांबारे यांच्या लक्षात आला. या संदर्भातील तक्रार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे केली असता. हा प्रकार उघड झाला.