With a sword in one hand and a puddle of petrol in the other, Jinning suffered a loss of Rs 46 lakh.
With a sword in one hand and a puddle of petrol in the other, Jinning suffered a loss of Rs 46 lakh.

एका हातात तलवार आणि दुसर्‍या हातात पेट्रोलची डबकी घेऊन, जिनिंगला आग 46 लाखाचे नुकसान.

 With a sword in one hand and a puddle of petrol in the other, Jinning suffered a loss of Rs 46 lakh.

आशीष अंबादे प्रतिनिधी

आर्वी, दि. 28 फेब्रुवारी:- काकाने एका हातात तलवार आणि दुसर्‍या हातात पेट्रोलची डबकी घेऊन कापसाच्या जीनमध्ये येऊन पेट्रोल टाकून पुतण्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला तसेच जीनमधील 46 लाख 33 हजार किमतीचा कापूस जाळला. ही घटना आज रविवार 28 रोजी घडली. या प्रकरणी पोलिसांनी काकास अटक केली.
 
मिळालेल्या माहितीनुसार, कौस्तुभ उर्फ गौरव किशोर देशमुख (29) रा. साईनगर आर्वी यांनी 2017 मध्ये चोलामंडल फायनान्स बँक नागपूर येथून 16 लाख रुपयांची कर्ज आणि अन्य काही रक्कम स्वत: जवळची टाकून देऊरवाडा मार्गावर केडी इंटरप्राईजेस जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरी टाकली आहे
 
दरवर्षी प्रमाणे शेतकर्‍याकडून कापूस खरेदी केला. कापसाची जिनमध्ये रोल पट्टा 1 टन 200 किलो अंदाजे किंमत 7 लाख 14 हजार रुपये, कापसाची सरकी 18 टन अंदाजे किंमत 4 लाख 89 हजार रुपये, कापसाच्या गठणी 56 किंमत 11 लाख 86 हजार रुपये, 100 क्विंटल कापूस अंदाजे किंमत 6 लाख असा एकूण 16 लाख 29 हजार 750 रुपये कापूस खरेदी करून ठेवला होता, असे तक्रारीत नमुद केले आहे.
 
पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार आज 28 रोजी सकाळी 8.30 वाजता जीनमध्ये गेलो असताना सकाळी 9 वाजताच्या सुमारास काका दीपक देशमुख आले. त्यांच्या हातात तलवार व दुसर्‍या हातात पेट्रोलची डबकी, तसेच त्याचा चालक बाबू नासरेही पेट्रोलची डबकी घेऊन आले. दीपक देशमुख यांनी टेबलवर तलवार आपटली व तुझा बाप माझी बदनामी करत आहे. हा जीन माझ्या पैशाने उभा केला त्यामुळे मी जीन पेटवून टाकतो आणि तुलासुद्धा पेटवून जिवे ठार मारतो अशी धमकी दिली. दरम्यान, त्यांनी पेट्रोल आपल्या अंगावर टाकून आपल्याला पेटवण्याचा प्रयत्न केला. आपण पळ काढला त्यानंतर दीपक आणि बाबू नासरे या दोघांनी जीन पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचे तक़्रारीत नोंदवले आहे. या घटनेची आर्वी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिस शिपाई भोयर, कावरे व मुन यांनी घटनास्थळावर पोहोचून दीपक देशमुख यांना तलवारीसह ताब्यात घेतले तर चालक बाबू नासरे पळून गेला. ठाणेदार संजय गायकवाड तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here