ग्रामिण कृषी संसाधन केंद्राचे उद्घाटन

प्रथम तेलंग
चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
मो नंबर ७०२००१६६८४
चंद्रपूर: मौजा भारोसा येथे २५ फेब्रुवारी रोजी अंबुजा सिमेंट फाऊंडेशन/उत्तम कापुस उपक्रम व गट ग्रामपंचायत भारोसा यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामिण कृषी संसाधन केंद्राचे उद्घाटन व एक दिवसीय सामाजिक सेवा शिबीर घेण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष देवराव निमकर सरपंच , उद्घाटक मा.श्रीकांत कुंभारे साहेब,प्रमुख मार्गदर्शक मा.खडसे सर, प्रमुख पाहुणे मा.सौ रूपालीताई तोंडासे सभापती पं.स.कोरपना ,मा.रवीभाऊ गोखरे माजी सभापती पं.स.कोरपना , उपसरपंच अर्चना भोजेकर ,ग्रा.प.सदस्य कल्पनाताई आगलावे, सेडि विभाग शिक्षक वर्ग, पोलिस पाटील सतिशभाऊ गेडाम,त.मु.स.सुनीलभाऊ तोंडासे तथा गावातील प्रतिष्ठित नागरिक ,महिला शेतकरी , विद्यार्थी तथा गावकरी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात खालिल विषयांवर माहिती देण्यात आली. 1)ACF/BCI चे कार्य. 2)ACFच्या आय.टी.आय.विभागाचे कार्य. 3) ग्रामिण कुषि संसाधन केंद्राचे महत्व. 4)नेटाफेम Dreep योजना.या विषयांवर माहिती देण्यात आली. उद्घाटन व मार्गदर्शन झाल्यानंतर गावातील शेतकरी बांधवांची शेती अवजारे वेल्डिंग करने, इलेक्ट्रिक दुरुस्ती करून देण्यात आली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक.बेलेरकर सर , सुत्रसंचलन हरीचंद्रभाऊ बोढे, आभार प्रदर्शन संजय गुरजेलवार यांनी केले.
हे आपण वाचलंत का?
- संघर्ष वाघ आणि माणसांचा: २०२१ मध्ये १२० वाघांचा मृत्यू, ८० लोकांना वाघांनी केले ठार
- सफरचंद न्यूटनच्या डोक्यावर पडलंच नव्हतं…