आॅल इंडिया स्टेशन मास्टर असोशिएसन’तर्फे मास्टर दिवसाचे आयोजन

68

दिवंगत पी. शिवन पिल्लाई यांच्या स्मृतीदिनी ‘मास्टर दिवसा’चे आयोजन केले जाते. या दिनानिमित्त पिल्लई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले जाते

ऑल इंडिया स्टेशन मास्टर असोशिएसन’ तर्फे मास्टर दिवसाचे आयोजन

विशाल गांगुर्डे, बदलापूर प्रतिनिधी
मोब. नं. – 9768545422

बदलापूर: ‘आॅल इंडिया स्टेशन मास्टर असोशिएसन’मार्फत २५ फेब्रुवारी रोजी ‘मास्टर दिवसा’चे आयोजन करण्यात आले. या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात स्टेशन मॅनेजरच्या कल्याण कार्यालयात संपूर्ण मुंबईतील ५०-५५ स्टेशन मास्टरांनी उपस्थिती दर्शवली.

‘आॅल इंडिया स्टेशन मास्टर असोशिएसन’तर्फे दिवंगत पी. शिवन पिल्लाई यांच्या स्मृतीदिनी ‘मास्टर दिवसा’चे आयोजन केले जाते. या दिनानिमित्त पिल्लई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले जाते. तसेच त्यांच्या आठवणींना स्टेशन मास्टरांकडून उजाळा दिला जातो.

हे आपण वाचलंत का?

 

पिल्लई यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित सदर मास्टर दिनाच्या कार्यक्रमात प्रदीप्त कु. दास (माजी राष्ट्रीय अध्यक्ष/दादर), धर्मवीर सिंह अड़ोरा (झोनल अध्यक्ष/ विक्रोली), अनुप कुमार जैन (स्टेशन मॅनेजर/कल्याण), गजेंद्र प्र. यादव (सचिव/मुंबई/ लोणावळा), संजय पांडे (कार्यकारी अध्यक्ष/मुंबई), धर्मेद्र कुमार (सहसचिव /मुंबई/ कल्याण), प्रेमनाथ (सहा०सचिव/मुंबर्इ/मुलुंड यार्ड), लाल मोहन सिंह (संघटन सचिव/शिवाजी महाराज टर्मिनल यार्ड), लक्ष्मण कुमार (पनवेल शाखा सचिव) प्रामुख्यांने उपस्थित होते. तसेच संघटनेतील इतर सदस्यांनी देखील आवर्जून उपस्थिती दर्शवली, अशी माहिती ‘आॅल इंडिया स्टेशन मास्टर असोशिएसन’ संघटनेचे कुमार कुंदन यांनी दिली.

https://www.instagram.com/p/CZtVnnDtzVJ/

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वृत्तांत जाणण्यासाठी मीडियावार्ताला INSTAGRAM वर आताच फॉलो करा.